विद्यार्थ्यांना कायद्याचे ज्ञान आवश्यक – पंकज जाधव

विटा. प्रतिनिधी.
शासनाने निर्गमित केलेल्या अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्याना कायद्याचे ज्ञान आवश्यक असून विद्यार्थीदशेतच कायदा समजून घेऊन त्याचे उल्लंघन न करता आपले ध्येय साध्य करावे असे मत बळवंत कॉलेजचे प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युनिअर विभागात राष्ट्रीय सेवा योजना मार्फत आयोजित केलेल्या ‘महिला सुरक्षितता’ या विषयावर बोलताना अधिवक्ता पंकज जाधव यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमास पर्यवेक्षक सर्जेराव सावंत, अजित साळुंखे, संताजी सावंत सविता बनसोडे उपस्थित होते.
जाधव पुढे म्हणाले, भारतीय संविधानाने आपल्याला दिलेले हक्क आणि कायदे याबद्दल अजूनही लोकांमध्ये अज्ञान आहे. मुळात त्याबद्दल जाणून घेण्याची जिज्ञासा विद्यार्थ्यांमध्ये असणे आवश्यक आहे. महिलांच्या तसेच पुरुषांच्या याबरोबरच बालगुन्हेगारीच्या बाबतीत असणारे कायदे, नियम याबद्दलची सखोल माहिती सांगून युवा पिढीने कोणत्याही अमिषाला बळी न पडता आपल्या आयुष्याची होळी करू नये असे आवाहन यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जाधव यांनी केले. यावेळी पर्यवेक्षक सर्जेराव सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास दिलीप जाधव, राम मुजमुले,नामदेव गुडघे, वैशाली जाधव, स्नेहल कदम, निलोफर मुलाणी यांच्यासह सर्व सेवकवृंद व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.



