ताज्या घडामोडी

चेंबूरच्या प्रभाग क्रमांक १५३ मध्ये मिनाक्षी पाटणकरांच्या प्रचाराचा झंझावात

मुंबई- चेंबूर परिसरातील अत्यंत लक्षवेधी लढत समजल्या जाणाऱ्या घाटला गाव वॉर्ड क्रमांक १५३ मधील शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवार मिनाक्षी अनिल पाटणकर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरू आहे.या मतदारसंघातील सर्व स्तरातून मतदारांचा मिनाक्षी पाटणकर यांना वाढता पाठिंबा दिसून येत आहे.

मिनाक्षी पाटणकर यांचे पती,’बेस्ट’ चे माजी अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी केलेल्या विविध विकास कामांचा ठसा या मतदारसंघात असल्याने मतदारांचा कौल प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मिनाक्षी पाटणकर यांच्या बाजूने असल्याची चर्चा ठिकठिकाणी सुरू झाली आहे.त्यांच्या प्रचारात महिलांचा सहभाग लक्षणीय मानला जात आहे. शिवसेना ठाकरे पक्षाचे घटक मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिनाक्षी पाटणकर यांच्या प्रचारात आघाडीवर राहिलेले दिसत आहेत. प्रचार करताना मिनाक्षी पाटणकर यांचे ठिकठिकाणी उत्स्फूर्तपणे स्वागत केले जात आहे.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??