ताज्या घडामोडी

इस्लामपूर /प्रतिनिधी
महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली व मुली शिकल्यामुळे समाजातील अनेक अनिष्ट प्रथा दूर करण्यास मदत झाली असे प्रतिपादन सौ अनुराधा पेडणेकर यांनी केले.त्या श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित कामेरी (ता. वाळवा) येथील शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे विद्यालय व माननीय छगनबापू पाटील गर्ल्स हायस्कूलमध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक दिलीप चरणे हे होते.
प्रारंभी मुख्याध्यापक दिलीप चरणे, प्रभारी मुख्याध्यापिका अनुराधा पेडणेकर, प्रभारी पर्यवेक्षक उमेश जाधव यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . अध्यक्ष स्थानावरून बोलताना मुख्याध्यापक दिलीप चरणे यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आयुष्यभर स्त्री शिक्षणासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेतला.
समक्षा पाटील यांनी स्त्री शिक्षणाचा पाया भक्कम करणाऱ्या सावित्रीबाईंच्या मुळेच आज ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे.
यावेळी सौ.सुवर्णा यादव, , इम्राण मुलाणी , सौ.किरण पवार, राजेंद्र जेडगे, माणिक माने, सर्जेराव जगताप उपस्थित होते.धनंजय पाटोळे यांनी सूत्रसंचालन केले तर हर्षवर्धन साळुंखे यांनी आभार मानले

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??