ताज्या घडामोडी

ईगल प्रतिनिधि – डॉ.सुनिल भावसार

सेलू :
साहित्य, कला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या श्रीराम प्रतिष्ठान, सेलू यांच्या वतीने आयोजित भव्य कवी संमेलन अत्यंत उत्साहात व साहित्यिक वातावरणात पार पडले. दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता आयोजित या कवी संमेलनात राज्याच्या विविध भागातून तब्बल 114 कवींनी सहभाग नोंदवत शब्दांचा अविस्मरणीय महोत्सव साजरा केला. रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात कवितांना भरभरून दाद दिली.
हे कवी संमेलन श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या संकल्पनेतून साकारले असून, साहित्यिक अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नवोदित कवींना प्रोत्साहन देणे व समाजप्रबोधन साधणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या कवी संमेलनास अधक्ष्य, श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे, सचिव डॉ. सविता रोडगे, मा. श्री. सुरज गुंजाळ (आयपीएस, अप्पर पोलीस अधीक्षक, परभणी), डॉ. रामराव रोडगे, सौ. निशा विसपुते, सौ. सिंधुताई दहिफळे, सौ. जयश्री सोनेकर, श्री. सर्जेराव लहाणे, श्री. शरद ठाकर, श्री. सुरेश हिवाळे, श्री. अशोक पाठक, श्री. योगेश ढवारे, डॉ. अपूर्वा रोडगे, डॉ. आदित्य रोडगे, यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कवी संमेलनात प्रेम, सामाजिक वास्तव, ग्रामीण जीवन, शेतकरी प्रश्न, स्त्री-सशक्तीकरण, देशभक्ती, मानवी संवेदना व सांस्कृतिक मूल्ये या विषयांवरील आशयघन कविता सादर करण्यात आल्या. नवोदित आणि ज्येष्ठ कवींनी सादर केलेल्या कवितांनी उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले होते. अनेक कवितांवर रसिकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला, तर काही कवितांनी भावनिक वातावरण निर्माण केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या डॉ. संजय रोडगे यांनी अध्यक्षीय समारोपात साहित्याचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले,
साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब असते. कवी हा समाजाचा जागता पहारेकरी असून त्याच्या शब्दांतून समाज जागृत होत असतो. आजच्या धावपळीच्या युगात मानवी मूल्ये जपण्याचे कार्य साहित्यच करू शकते. ग्रामीण भागातील साहित्यिक प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळावे, नवोदित कवींना प्रोत्साहन मिळावे आणि संस्कृतीची वीण अधिक घट्ट व्हावी, हाच श्रीराम प्रतिष्ठानच्या साहित्यिक उपक्रमांचा उद्देश आहे. आज 114 कवींनी एकत्र येऊन जो शब्दांचा उत्सव साजरा केला, तो निश्चितच सेलूच्या साहित्यिक इतिहासात मैलाचा दगड ठरेल.
यावेळी त्यांनी सहभागी सर्व कवी, मान्यवर पाहुणे, रसिक प्रेक्षक तसेच आयोजन समितीतील सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले. भविष्यातही अशाच दर्जेदार साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक श्री. भरतकुमार लाड, श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्राचार्य, प्रा. अशोक बोडके, सौ. प्रगती क्षीरसागर, डॉ. मीनाक्षी रत्नपारखी, प्रा. कैलास ताठे, श्री. कृष्णा सापणर, प्रा. गजानन जाधव, प्रा. हरीभाऊ कांबळे, प्रा. अर्जुन गरुड, श्री. रवी रोडगे, गणेश येवले, तसेच श्रीराम प्रतिष्ठानचे सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
श्रीराम प्रतिष्ठानच्या या कवी संमेलनामुळे सेलू शहरात साहित्यिक वातावरण निर्माण झाले असून, साहित्य, कला व संस्कृती क्षेत्रात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याची भावना रसिकांमधून व्यक्त होत आहे

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??