ताज्या घडामोडी

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांच्याकडे अद्यावत ज्ञान आवश्यक.. सरपंच वंदना सूर्यवंशी

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी शिक्षकांच्याकडे अद्यावत ज्ञान आवश्यक.असणे गरजेचे आहे तरच ग्रामीण भागात चांगले विद्यार्थी घडू शकतील. असे प्रतिपादन वांगी गावच्या सरपंच वंदना सूर्यवंशी यांनी केले.त्या कामेरी तालुका वाळवा येथील शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे विद्यालय व माननीय छगनबापू पाटील गर्ल हायस्कूल येथे 1989 – 90 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यालयास डिजिटल क्लासरूम साठी टीव्हीसंच भेट देतेवेळी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्रभारी पर्यवेक्षक उमेश जाधव हे होते.

यावेळी1989 – 90 च्या बॅचच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यालयास ओनिडा कंपनीचा 35 हजार रुपये किमतीचा टीव्ही संच भेट देण्यात आला.
यावेळी बोलताना महेश साळुंखे यांनी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या आपल्याकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्न करणे गरजेचे आहे. बदलत्या शिक्षण प्रवाह मध्ये टिकण्या
साठी गुणवत्ते शिवाय पर्याय नाही. यावेळी बोलताना गर्ल्स हायस्कूलच्या प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमतीअनुराधा पेडणेकर यांनी विद्यालयाची विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी सहकार्य करावे असे आवहान केले.
आपल्या प्रास्ताविकात उमेश जाधव यांनी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था व शाखा उभारणीत कामेरी गावच्या योगदानाबद्दल माहिती दिली व विद्यालयातील भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या मदतीबद्दल त्यांची आभार व्यक्त केले.
मुख्याध्यापक दिलीप चरणे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमास रवींद्र पाटील, बाळासाहेब जाधव, सुभाष पाटील, जगन्नाथ देसाई, जयदीप जाधव,शांताराम माळी, विकास पाटील, सपना जमदाडे लतिका जाधव,सुनिता पाटील,रेखा पाटील, सुनील पाटील विकास पाटील युवराज पाटील उपस्थित होते. सौ सुवर्णा यादव, धनंजय पाटोळे, इम्रान मुलाणी , किरण पवार राजेंद्र जेडगे, माणिक माने, प्रतीक कांबळे, सर्जेराव जगताप यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. सौ.समक्षा पाटील यांनी सूत्रसंचालन केले यू.बी जाधव यांनी प्रास्ताविक केले, हर्षवर्धन साळुंखे यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??