धुणे भांडी घरकाम करणाऱ्या 101 खऱ्या सावित्रीच्या लेकींचा साडीचोळी देऊन केला सन्मान!!

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एसएम पाटील *धुणे भांडी घरकाम करणाऱ्या 101 खऱ्या सावित्रीच्या लेकींचा साडीचोळी देऊन केला सन्मान!! कारंजा कला, क्रीडा अकादमी व गुरुकुल स्कूल आणि माळी महासंघाचे आयोजन..
चित्रंपट दिग्दर्शक,लोकप्रतिनिधी आणि सामाजिक लोकनेत्याची हजेरी. कारंजा दि.5 जानेवारी
क्रांतीज्योती सावित्रीमाई जोतिबा फुले यांचे जयंती पर्वावर कारंजा शहरात स्वयंपाक,धुणी,
भांडी व झाडू पोचा घरकाम करणाऱ्या 101 सावित्रीच्या लेकींचा शहरात प्रथमच भव्यदिव्य असा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला सूत्रसंचालन प्रास्ताविक ज्येष्ठ नागरिक संघाचे विलास वानखेडे यांनी केले. आर्वी विधानसभेचे आमदार सुमितदादा वानखेडे यांचे अध्यक्षतेखाली
मराठी चित्रपट यशवंत चे दिग्दर्शक,जुना फर्निचर चित्रपटाचे सहकलाकार पीयूष विजय भोंडे यांचे हस्ते लेडी गव्हर्नर प्राचार्य डॉ.कमल गवई भारताचे मा.सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या मातोश्री तसेच मिशन आय ए एस चे संचालक डॉ.प्रा.नरेशचंद्र काठोळे,विद्या काठोळे,वर्धा जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सरिता गाखरे,ठाणेदार अनिल मेश्राम यांचे प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन व सावित्री आणि जोतिबा यांच्या प्रतिमा पूजनाने उद्घाटन सोहळा पार पडला.
कारंजा कला क्रीडा अकादमी, गुरुकुल पब्लिक स्कूल आणि माळी महासंघ कारंजा तसेच कारंजा घाडगे शहरातील दान
दात्यांच्या सहकार्याने स्व. मन्नालाल मातादिन अग्रवाल सभागृहात आयोजित या सोहळ्यात
गुलाब पुष्प,ग्रामगीता, व शाल देऊन पाहुण्याचे स्वागत व सत्कार आयोजकातर्फे करण्यात आला.
पुष्पगुच्छ,पुस्तक,सन्मान चिन्ह तसेच साडी चोळी भेट देऊन व स्मृतिचिन्ह भेट देऊन घरकाम करणाऱ्या लेकींचा सन्मान करण्यात आला.
मी सावित्री बोलतेय ही नाट्यछटा सादर करणारी गुरुकुल पब्लिक स्कूलची धनश्री किशोर जत्ती व सावित्री जोतिबा यांची सुंदर रांगोळी साकारणारे
वैष्णवी राजेश घिमे व आदित्य या युवा कलाकारांना तसेच स्वागत गीत व सावित्रीबाईवर गीत सादर करणाऱ्या तसेच दान दात्यांना पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कारंजा शहरात प्रथमच अशा आगळ्यावेगळ्या सोहळ्याचे आयोजन होत असल्याचे आमदार सुमितदादा म्हणाले.सावित्रीबाई ही महिलांसाठी एक प्रेरणादाई आदर्श असल्याचे डॉ कमल गवई यांनी सांगितले.महिलांनी आपल्या मुलांना कलेक्टर बनण्यासाठी पुढाकार घ्यावा असे मत मिशन आयएएस चे नरेशचंद्र काठोळे यांनी व्यक्त केले.फुले दाम्पत्यांनी विविध सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिले असे विचार उद्घाटक मराठी चित्रपट यशवंत चे दिग्दर्शक पीयूष भोंडे यांनी मांडले.
सदर सन्मान सोहळ्यात शिक्षण क्षेत्रात सेवा दिलेल्या स्वर्गीय भारती प्रकाश धारपुरे व स्वर्गीय नीलिमा राजेश जोरे,स्वर्गीय प्रा.वंदना अशोक पराडकर स्मृतिप्रीत्यर्थ सन्मान चिन्ह देण्यात आले.
सरिता गाखरे,कल्पना मस्की, नीता मिश्रा,सुजाता कांबळे,संगीता कुरमेती,संगीता कामडी,प्रा.सतीश काळे, राजेश जोरे,ॲड प्रकाश धारपुरे, ॲड अशोक पराडकर,शुभम विलास वानखडे,रवी राऊतकर,राहुल पैठणे,संजय सातपुरे,
प्रल्हाद(पैलू) मोटवानी, डॉ.दादाराव रामटेके,प्रा.डॉ.गणेश
मोहोड,राजू डोंगरे,रमेशराव नांदणे,प्रा.नेत्राम ढोबाळे,राम प्रांजळे, ज्ञानेश्वर गावंडे, इत्यादी
दान दात्यांच्या आर्थिक सहकार्यातून भेटवस्तू देण्यात आल्या.
प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय आयोजक विलास वानखडे यांनी तर आभारप्रदर्शन शरद बोके यांनी केले.उत्कृष्ट सूत्रसंचालन जया विनोद ठोंबरे यांनी केले.
कारंजा कला क्रीडा अकादमी तर्फे सत्कार व स्वागत व्यवस्था तसेच गुरुकुल पब्लिक स्कूलतर्फे सभागृह व बैठक व्यवस्था व माळी महासंघातर्फे अल्पोपहारची व्यवस्था साठी सहकार्य करण्यात आले..
कारंजा शहरात प्रथमच पार पडलेल्या घरकाम करणाऱ्या सावित्रीमाईच्या लेकीच्या सन्मान सोहळ्यात उपस्थितांनी आनंद व्यक्त केला.मुख्य आयोजक विलास वानखडे अध्यक्ष कारंजा कला क्रीडा अकादमी,अजय भोकरे सचिव गुरुकुल पब्लिक स्कूल आणि
संजय कदम माळी महासंघ कारंजा यांच्या पुढाकाराने हा सोहळा पार पडला.
गुरुकुलचे शरद बोके,आशिष मानकर,माळी महासंघाचे नितीन बनकर,सुदर्शन चरपे,कारंजा कला क्रीडा अकादमी चे,प्रा.सतीश काळे,अनिस मुल्ला यांनी यशस्वितेसाठी सहकार्य केले.


