क्रीडा व मनोरंजन

आयव्हीपीएल क्रिकेट स्पर्धेत अभिजित कदम यांची जोरदार धडक

Spread the love

भारतीय क्रिकेट नियमक मंडळाच्या नियंत्रणाखाली बोर्ड ऑफ व्हेटरन्स क्रिकेट असोसिएशनने यावर्षी पहिल्यांदाच आय.पी.एल.च्या धर्तीवर इंडियन व्हेटरन प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यात सोनसळ (ता. कडेगाव) येथील आणि सांगली जिल्हा क्रिकेट संघाचे खेळाडू होईल. अभिजित कदम यांनी धडक मारली.स्पर्धेसाठी देशभरातून निवडलेल्या २०० जणांच्या यादीत अभिजित यांनी स्थान मिळवले आहे. व्हेटरन्स क्रिकेट असोसिएशन पहिल्यांदाच
अभिजित कदम यांना दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर २७ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत खेळाडूंना आपली कामगिरी दाखवण्याची संधी असेल. देशभरातील अव्वल २०० खेळाडूंतून कामगिरीच्या आधारावर आयव्हीपीएल स्पर्धेसाठी खेळाडू उपलब्ध करून दिले जातील. सहा संघांमध्ये वर्षाखेरीस मुख्य स्पर्धा होईल.

वयाच्या चाळिशीनंतर प्रीमिअर लीग जागतिक पातळीवरील व्यासपीठावर ते क्रिकेट स्पर्धेत पोहोचले. देशभरात विविध स्पर्धातून ते भाग घेत आहे. दमदार कामगिरी करणाऱ्या २०० जणांची निवड झाली. अभिजित यांनी जिल्हा क्रिकेट संघाकडून सातत्याने चमकदार कामगिरी केली. सलग पाचवेळा ते रणजी शिबिरात होते.महाराष्ट्रातून चार जण निवडले गेले.निवृत्त आंतरराष्ट्रीय खेळाडू जॉन्टी व्होड्स, ख्रिस लुईस हेही त्यात सहभागी असतील. अभिजित कदम यांना भारती विद्यापीठाचे कार्यवाह, आमदार विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत, राज्य क्रिकेट संघटनेचे स्पर्धा खजिनदार संजय बजाज, डॉ. जितेश कदम, नामदेवराव मोहिते, बाळासाहेब कदम, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, उदय शिंदे, सागर बिजें, ज्येष्ठ प्रशिक्षक अनिल जोब यांचे सहकार्य मिळाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!