क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडी

शेतात काम करीत असताना चारचाकी गाडीतून येवून गळ्यातील दीड तोळे सोन्याची बोरमाळ जबरदस्तीने हिसडा मारून तोडून पळून जाणारास कुरळप पोलीसांकडून जेरबंद

Spread the love

कुरळप पोलीस ठाणेत गु.र.नं. २३/२०२३ भा.द.स. कलम ३९२, ३४ प्रमाणे दि. ०९/०२/२०२३ रोजी दाखल आहे. सदर गुन्ह्यात तांदुळवाडी येथे यातील फिर्यादी शेतात काम करीत असताना गुन्ह्यातील आरोपी चारचाकी गाडीतून येवून फिर्यादी यांचे गळ्यातील दीड तोळे सोन्याची बोरमाळ जबरदस्तीने हिसडा मारून तोडून पळून गेले होते. गुन्हा तपासादरम्यान गोपणीय माहितीदार, तांत्रिक मदतीने यातील तीन आरोपी १) सैफअली शेरअली नगारजी वय- २२ वर्षे २) अश्रफअली शेरअली नगारजी वय १८ वर्षे ३) विधिसंघर्षित बालक वय- १६ वर्षे सर्व रा. निपाणी ता. निपाणी जि. बेळगांव राज्य कर्नाटक यांना ताब्यात घेतले त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांचेकडून गुन्ह्यात वापरलेले वाहन सैन्ट्रो कार नं. एम.एच. १२ ई.जी. ६७१९ हस्तगत केले. तसेच गुन्हा तपासादरम्यान आरोपींकडून गुन्ह्यातील चोरी केलेली सोन्याची बोरमाळ हस्तगत केली. यातील आरोपींवर निपाणी टाऊन पोलीस ठाणे कर्नाटक येथे खून, खुनाचा प्रयत्न, यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. घरफोडी

सदरचा गुन्हा उघडकीस आणणेकामी मा. बसवराज तेली, पोलीस अधीक्षक सो, सांगली, मा. ऑचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक, सांगली तसेच मा. पद्मा कदम, उपविभागीय पोलीस अधिकारी इस्लामपूर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी स.पो.नि. दिपक जाधव, दुय्यम अधिकारी पोलीस उप-निरीक्षक विजय पाटील, पोलीस अंमलदार पोहेकॉ / १५३९ महाडीक, पोना/१५७६ पाटील, पोकों/२४३ मोरे, पोकॉ/३०५ पाटील, पोकॉ/७२८ देवळेकर, पोकॉ/१३५ शिंदे यांनी गुन्हा उघडकीस आणणेकामी प्रयत्न केले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!