क्रीडा व मनोरंजन

बुधवारपासून स्वामी समर्थची व्यावसायिक कबड्डी स्पर्धा

Spread the love

मुंबई, प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्यावतीने येत्या ८ ते ११ फेब्रूवारीदरम्यान प्रभादेवीच्या चवन्नी गल्लीत उभारलेल्या दिलीप परब क्रीडानगरीत राजाभाऊ देसाई स्मृतीचषकासाठी विशेष व्यावसायिक पुरूष गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

विशेष व्यावसायिक स्पर्धेचे आयोजन करताना भारत पेट्रोलियम, इन्शुअरकोट स्पोर्टस् (युवा पलटन), मध्य रेल्वे, युनियन बँक, मुंबई महानगर पालिका, ठाणे महानगर पालिका, बँक ऑफ बडोदा, हिंदुजा हॉस्पिटल, न्यू इंडिया अशुरन्स अशा बलाढ्य संघांचा ‘दम’दार खेळ पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
भारत पेट्रोलियमचे रिशांक देवाडिगा, गिरीश इरनाक, निलेश शिंदे, विशाल माने, आयएसपीएलचे अस्लम इनामदार, आकाश शिंदे, मोहित गोयत, युनियन बँकेचे सुयोग गायकर, आदित्य शिंदे, बँक ऑफ बडोदाचे प्रणय राणे, किरण मगर, नितीन देशमुख हे कबड्डीचे सुपरस्टार या स्पर्धेत खेळताना दिसतील.
विजेत्या संघाला एक लाख आणि उपविजेता संघालाही पाऊणलाख आणि चषक दिला जाणार आहे.. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूही सोनसाखळी जिंकेल तर चढाई आणि पकडवीरालाही सोन्याची भेटवस्तू दिली जाणार आहे.स्पर्धेत एकंदर १२ बलाढ्य संघ खेळणार असून तीन-तीन संघांचे चार गट खेळविले जातील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!