ताज्या घडामोडी

स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर प्रशालेचे एन एम एम एस परीक्षेत उत्तुंग यश

Spread the love

शाळेचा सलग तीन वर्षे जिल्ह्यात प्रथम क्रमांक
पावस. ग्राम सुधारक सेवा समिती पावस मुंबई संचलित स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर प्रशालेने राष्ट्रीय आर्थिक मागास शिष्यवृत्ती NMMS परीक्षा 2023 24 मध्ये मागील सतत चार-पाच वर्षापासून चा यशाचा आलेख वाढता ठेवण्यात नावलौकिक प्राप्त केला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या एन एम एम एस परीक्षा गुणवत्ता यादीमध्ये स्वामी स्वरूपानंद विद्यामंदिर प्रशालेचे तब्बल 33 विद्यार्थी चमकले. यामध्ये कुमारी आदिती अशोक आंब्रे हिने सर्वसाधारण गटातून जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे तर कुमारी तन्वी राजेश बाणे हिने चौथा क्रमांक प्राप्त केला आहे. एनटी प्रवर्गातून कुमारी गायत्री अनंत कोकरे ही रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम आली आहे तर एसटी प्रवर्गातून कुमारी निकिता सुरेश नाईक हिनेसुद्धा रत्नागिरी जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. एसबीसी प्रवर्गात कुमारी संचिता शरण हरचकर ही रत्नागिरी जिल्ह्यात दुसरी आली आहे. जिल्हा गुणवत्ता यादीत कुमारी सई समीर चांदोरकर, कुमारी कादंबरी अनंत झोरे, कुमारी मानसी मारुती फुटक, भोसले अक्षरा कुंदन, भोसले अनुष्का अनिल, गुरव दिव्या प्रभाकर, जाधव पायल जितेंद्र, कोकरे अनघा विलास, लिंगायत पुर्वा दिपक, मेस्त्री दिक्षा देवेंद्र,मेस्त्री सृष्टी प्रविण, म्हादये पूर्वा विलास, मोरे श्लोका रुपेश, तळेकर दुर्वा दिपक, वजरेकर जिज्ञा सुधाकर, भोसले दिपेश दिपक, चांदोरकर तनिष सुरेश, फुटक आदित्य दिवाकर, गुरव साहस सुहास, म्हादये स्मित नितीन, राऊत सम्रर्थ जितेंद्र, सुर्वे आर्यन अमर, विलणकर जय प्रकाश, राड्ये धनश्री नरेश, पवार पर्णिका प्रदिप ,खानविलकर आदेश अजय, सुर्वे विक्रम विनोद, शिंदे आदिती महेंद्र. या सर्व विद्यार्थ्यांनी स्थान प्राप्त करून शाळेच्या गुणवत्तेचा अटकेपार झेंडा रोवला आहे. मागील सलग तीन वर्षात जिल्हास्तरावर सर्वाधिक विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकून शाळेने अव्वल क्रमांकाची हॅट्रिक साधली आहे. प्रशालेच्या या कार्याची दखल घेऊन रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी माध्यमिक. श्रीमती सुवर्णा सावंत मॅडम उपशिक्षणाधिकारी श्री गावंड साहेब, श्री चौधरी साहेब अधीक्षक श्री चौगुले साहेब इत्यादी मान्यवरांनी प्रत्यक्ष शाळेला भेट दिली सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, श्रीमती उमाताई लेंडवे श्रीमती आस्था घवाळी श्री सचिन कडवेकर श्री दिलीप मयेकर श्री सुदाम चौरे श्री बाबाजी कुरतडकर,श्री.हरीश सामंत, श्री. अरविंद वाघचवरे मुख्याध्यापक श्री बाबासाहेब माने , संस्था पदाधिकारी श्री सुरेश गुरव श्री संतोष सामंत श्री माधव पालकर यांचा सन्मान केला. सर्व गुणवंत विद्यार्थी, पालक, पावस दशक्रोशीतील शिक्षणप्रेमी मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे संस्था अध्यक्ष श्री.प्रमोद पाथरे, उपाध्यक्ष श्री रवि साळुंके, कार्यवाह श्री. सुरेशजी गुरव, शालेय समिती अध्यक्ष श्री संतोष सामंत, लोकल कमिटी अध्यक्ष श्री माधव पालकर,आणि सर्व संस्था पदाधिकारी यांनी हार्दिक अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!