ताज्या घडामोडी

चंद्रशेखर तांदळे यांची राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी निवड

Spread the love

इस्लामपूर,
येथील लोकराज्य विद्या फौंडेशनचे संस्थापक चंद्रशेखर प्रकाश तांदळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाळवा तालुका कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
विटा येथे झालेल्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांच्या हस्ते त्यांना निवड पत्र देण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष केदार पाटील,स्वप्निल टिबे,दादा पाटील,विरेंद्र राजमाने,प्रमोद खुडे,संजय पाटील,तैसीन आत्तार,तेजस्विनी पाटील, चित्रा सूर्यगंध,उषा जाधव, वैजयंती ढवळे, भाग्यश्री माने उपस्थित होते.

चंद्रशेखर तांदळे यांनी यापूर्वी भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणुन काम केले असून इस्लामपूर नगरपरिषदेची निवडणुकही लढवली होती.
लोकराज्य विद्या फौंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणीक उपक्रम त्यांनी सातत्याने राबविले आहेत. संपूर्ण राज्यात स्मशानभूमी स्वच्छता व प्रबोधन अभियान यशस्वीपणे त्यांचे सुरू आहे. नगरपरिषदेच्या त्यांनी विरोधात विविध आंदोलने केली आहेत.
यावेळी चंद्रशेखर तांदळे म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली वाळवा तालुक्यात आणि परिसरात सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पक्षाचे विचार, ध्येयधोरणे पोहचवून त्यांच्या न्याय-हक्कासाठी लढा उभा करणार आहे. महिला, युवक यांच्यासाठी पक्षाच्यावतीने विविध उपक्रम घेणार आहे.माजी मंत्री डॉ.अण्णासाहेब डांगे,सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक राहूल महाडिक,सम्राट महाडिक यांनी तांदळे यांचे अभिनंदन केले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!