ताज्या घडामोडी

डॉ. आंबेडकरांचे शैक्षणिक विचार सर्वांसाठी प्रेरणादायी : डॉ. मोहन लोंढे

Spread the love

शासकीय वसतिगृहात डॉ. आंबेडकर जयंती उत्साहात संपन

कवठेमहांकाळ : (दि. १८) (प्रा.विजय कोष्टी )*
येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर,मुलांचे शासकीय वसतिगृहामध्ये विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीच्या निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पी.व्ही.पी.महाविदयलय, कवठेमहांकाळ येथील साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे, समाजभूषण पुरस्कार प्राप्त प्रा.(डॉ.) मोहन लोंढे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना त्यांनी ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे वाचन व शिक्षणविषयक विचार’ या विषयावर् वैचारिक मांडणी करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलु बरोबरच त्यांचे वाचन व शिक्षण विषयक विचार याविषयी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. यावेळी सामुदायिक संविधान वाचन व प्रार्थना घेणेत आली. तसेच वसतिगृहाचे अधिक्षक श्रीकांत फाकडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्या विषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी शासकीय,बी व्ही जी ,क्रिस्टल कर्मचारी तसेच प्रवेशित विद्यार्थी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!