ताज्या घडामोडी

मंगरूळ तालुका पारोळा येथे हभप हिरामण नारायण वारुळे महाराज सकाळी पाच वाजता हरिनामाने करतात जनजागृती

Spread the love

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील  मंगरूळ तालुका पारोळा येथील श्री हभप हिरामण नारायण वारुळे वय 66 हे सकाळी पाच वाजेपासून उठून टाळ विना हाती घेऊन संपूर्ण गावामध्ये हरिनामाचा जागर करत आणि नामाचे महत्त्व सांगत संपूर्ण गावभर जण जागृती करत असतात. उठा उठा माय -बाप सेना आला दारी । ही घ्या हरिनामाची शिदोरी ।। सुमारे 32 वर्षापासून सुरू केलेली ही पंरपरा जनजागृती अजून चार वर्षे पुढे करायची असल्याने ईगल न्यूज़ प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितलं श्री हिरामण नारायण वारुळे हे नाव्ही समाजाचे असून संत सेना महाराज व वैकुंठवासी हभप मोहन आण्णासो यांच्या प्रेरणेने व वारकरी संप्रदायाच्या प्रचारासाठी हे कार्य करीत आहेत त्यांचा मूळ व्यवसाय केस कर्तनाचा आहे त्यांना वडिलोपाडजीत शेती देखील आहे त्यांना दोन मुलं असून दोन्ही मुलं नासिक येथे केस करतनाचे काम करतात.तीन मुली असून ते त्यांच्या घरी सुखाने नांदत आहेत तसेच सर्व गाव सुखाने नांदावं म्हणून ते सकाळी प्रभू रामचंद्राचा हरिनामाचा जागर करत सर्वांना उठवत आहेत अशा या थोर महान संत सेनाच्या वंशामध्ये जन्मलेल्या हभप।हिरामण महाराज यांना मानवंदना देणारे सकाळी-सकाळी त्यांचा नमस्कार करणारे वारकरी ,भावीक त्यांना शुभेच्छा देतात आणि त्यांचा आशीर्वाद घेतात अशी परंपरा कायम गावी चालावी असे अनेक भाविकांच्या मनी येत असतं

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!