ताज्या घडामोडी

जागतिक शिक्षक दिनी शिक्षकांची संवेदनशीलता, शिक्षक समूह व लायन्स क्लब ऑफ तारापूर कडून जखमी विद्यार्थ्यास आर्थिक मदत

पालघर :

मुरबे येथील सेवाश्रम विद्यालयातील इयत्ता दहावीचा विद्यार्थी कुमार वंश सतकर हा सफाळे येथे सुरू असलेल्या शासनमान्य शालेय कबड्डी स्पर्धेत खेळत असताना शनिवारी (ता. ४) गंभीर जखमी झाला. खेळादरम्यान त्याचा हात मोडल्याने (फॅक्चर) रविवारी सकाळी बोईसर येथील आनंद हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली.दुर्दैवाने, वंशच्या वडिलांचे निधन झाले असून कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आहे. या अवस्थेत वंशच्या उपचारासाठी व्हाट्सअप वर मदतीचे आवाहन करण्यात आले असता, शिक्षकांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येऊन सुमारे ₹40,000 जमा केले, तर लायन्स क्लब ऑफ तारापूर तर्फे ₹20,000 जमा करून 60, 000 रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.जागतिक शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांनी दाखवलेल्या या संवेदनशीलतेच्या कृतीने समाजासमोर एक उत्तम आदर्श निर्माण केला आहे. सदर धनादेश पालघर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष तथा लायन्स झोन चेअरपर्सन प्रमोद पाटील, लायन्स क्लब तारापूर क्लबचे प्रेसिडेंट विरल शहा, रिजन चेअर पर्सन अतुल दांडेकर, झोन चेअर पर्सन सचिन गांधी, क्रीडा महासंघाचे समन्वयक तथा मुख्याध्यापक नरेंद्र घरत, तालुका अध्यक्ष राजेंद्र सांबरे पाटील, अशोक वाढिले यांच्या हस्ते वंशची आई सुनिता सतकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला असून वंशच्या उपचारासाठी ही मदत उपयोगी पडणार आहे.

गुरुकुल उपक्रमशील शिक्षक समूह हा केवळ शिक्षकांचा संघ नाही, तर मानवतेचे मूल्य जपणारे एक संवेदनशील कुटुंब आहे. समाजातील गरजवंतांना मदतीचा हात देण्याची परंपरा या समूहाने गेल्या अनेक वर्षांपासून जपली आहे.
याच परंपरेचा भाग म्हणून या समूहाने पूर्वी —
~ सन 2016 मध्ये औरंगाबाद येथे आंदोलनादरम्यान मृत्यू पावलेल्या जालना येथील शिक्षकाच्या कुटुंबाला ₹55,555 मदत.
~ सन 2019 मध्ये कोल्हापूर पूरग्रस्त जनता विद्यालयाला ₹1,06,222 शैक्षणिक मदत.
~ पालघर येथील विनाअनुदानित शाळेतील शिक्षकाच्या पत्नीच्या गंभीर आजारासाठी ₹1,36,055 आर्थिक सहाय्य.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??