जायंटस ग्रुप ऑफ उल्हासनगर यांच्या वतीने शिक्षक दिन व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न…

शिक्षक दिनाचे औचित्य साधून जायंटस ग्रुप ऑफ उल्हासनगर यांच्या वतीने हनुमान व्यवस्थापक मंडळ संचलित छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळा कुर्ला कॅम्प,उल्हासनगर-४ येथे शिक्षक दिन मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला.याप्रसंगी छत्रपती शिवाजी प्राथमिक शाळेच्या शिक्षक बंधू -भगिनींचा सत्कार कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जायंटस वेल्फेअर फेडरेशन वन सीचे कौन्सिल सदस्य एनसीएफ प्रा.डॉ.प्रकाश माळी,हनुमान व्यवस्थापक मंडळाचे व जायंटस ग्रुप ऑफ उल्हासनगरचे अध्यक्ष डॉ.अनिल पावसे तसेच सदस्य विठ्ठलराव पावसे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.शाळेतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना डॉ.अनिल पावसे व मंडळाचे आजीव सदस्य शंकरराव ठुबे यांनी प्रायोजित केलेले शैक्षणिक साहित्य व खाऊ मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.या शुभ प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.नलिनी कुंवर,जायंटस ग्रुप ऑफ उल्हासनगरचे जितेंद्र माळोदे,योग शिक्षिका धनश्री शिंदे,सहेली ग्रुपच्या माळोदे मॅडम,सर्व शिक्षक बंधू-भगिनी,शिक्षकेतर सहकारी व शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित उपस्थित होते.नवलसिंग पाटील यांनी सदर कार्यक्रमाचे ओघवते सूत्रसंचालन करून उपस्थितांचे ऋण देखील व्यक्त केले.