युवा नेतृत्वाला मिळालेला हा सन्मान ही घबकवाडी ग्रामपंचायतीसाठी अभिमानाची बाब. – रणधीर नाईक

शिराळा प्रतिनिधी
या निवडीबद्दल यशवंत ग्लुकोज कारखान्याचे चेअरमन मा. रणधीर नाईक (पापा) यांनी श्री. खोत यांचा सत्कार करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी बोलताना नाईक पापा म्हणाले की, “गावाच्या विकासासाठी जबाबदारीने कार्य करणारे नेतृत्व आवश्यक आहे. सचिन खोत यांच्या निवडीमुळे ग्रामपंचायत कार्य अधिक सक्षम व गतिमान होईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सत्कार सोहळ्यास गावातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये श्री. विनायक कदम, माजी सरपंच श्री. मोहन पाटील, माजी उपसरपंच आनंदराव कदम, ग्रामपंचायत सदस्य नानासो घबक, बाजीराव खोत, अमर पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना श्री. सचिन खोत हे तरुण, उत्साही व विकासाभिमुख व्यक्तिमत्त्व असल्याने गावातील विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यास तसेच पायाभूत सुविधा उभारणीस गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तरुणाईसमोर आदर्श निर्माण करणारे नेतृत्व म्हणून त्यांचे कौतुक करण्यात आले.गावातील सर्व घटक एकत्र येऊन विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहू, असा निर्धार यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केला.