कामेरी येथे स्वर्गीय छगनबापू पाटील यांच्या फोटोचे अनावरण

कामेरी सारख्या ठिकाणी डॉ. बापूजी साळुंखे यांना बहुजन समाजातील मुला मुलींना स्वतःच्या गावामध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळावी म्हणून कामेरी येथे माध्यमिक शाळा सुरू करण्यासाठी स्व. छगनबापू पाटील यांनी मोलाची साथ दिली ; दिलीप चरणे
इस्लामपूर / प्रतिनिधी
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गावोगावी शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवणाऱ्या शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी कामेरी सारख्या ठिकाणी बहुजन समाजातील मुला मुलींना स्वतःच्या गावामध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळावी म्हणून माध्यमिक शाळा सुरू करण्या साठी स्वर्गीय छगनबापू पाटील यांच्यासारख्या लोकांनी सहकार्य केले. त्यामुळेच आज शिक्षणाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचली आहे. असे प्रतिपादन मुख्याध्यापक दिलीप चरणे यांनी यांनी केले.
ते कामेरी तालुका वाळवा येथील डॉ. बापूजी साळुंखे विद्यालय व माननीय छगनबापू पाटील गर्ल्स हायस्कूल या ठिकाणी आयोजित फोटो अनवरण कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. जयश्री चंद्रकांत पाटील या होत्या
यावेळी बोलताना सौ. जयश्री पाटील म्हणाल्या स्व. छगन बापू पाटील यांचा प्रेरणादायी इतिहास आजच्या युवा पिढी पुढे राहावा म्हणून त्यांच्या फोटोचे अनावरण डॉ. बापूजी साळुंखे विद्यालय कामेरी येथे करण्यात आले. हा अतिशय चांगला उपक्रम असल्याचे मत त्यांनी व्यस्त केले. सौ जयश्री पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आले तर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जयराज पाटील यांचे वाढदिवसानिमित्त विद्यालयातील दोनशे विद्यार्थ्यांना प्रत्येकी दोन वह्यांचे वाटप करण्यात आले. बाळागिरी मित्र मंडळ यांचे वतीने विद्यार्थ्यांना लाडू वाटप करण्यात आले
यावेळी कामेरीचे उपसरपंच नंदूकाका पाटील यांचे हस्ते व एस. आर. पाटील ,धनंजय पाटील,सौ सुजाता पाटील , राजेंद्र मदने, एस वाय पाटील,पंडित पाटील,प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती.अनुराधा पेडणेकर, जयदीप जाधव,सुनिता खंडागळे, विकास पाटील, मुकुंद माळी, सद्दाम संदे .इलाही इनामदार, प्रभारी पर्यवक्षक यू .बी.जाधव यांचे प्रमुख उपस्थितीत फोटोचे अनावरण करण्यात आले. सौ. एस. आर यादव व डी.बी पाटोळे यांनी सूत्रसंचालन केले. सौ. एस. एम पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन हर्षवर्धन साळुंखे, प्रतीक कांबळे, सौ किरण पवार, सविता जानकर, राजेंद्र जेडगे माणिक माने, सर्जेराव जगताप यांनी केले.