ताज्या घडामोडी

पर्यायी मांडणीची आवश्यकता : डॉ. बोरुडे

पणजी ( आमच्या प्रतिनिधीकडून ) सांस्कृतिक भवतालाचा अभ्यास करताना साहित्यामध्ये दोन प्रकारच्या विचारधारा अस्तित्वात असल्याचे जाणवते .या दोन्ही विचारधारांचे आपापले सौंदर्यशास्त्र आहे .पैकी एका विचारधारेचे संदर्भशास्त्र हे लिखित स्वरूपात आहे तर दुसऱ्या प्रकारच्या विचारधारेचे सौंदर्यशास्त्र हे अलिखित स्वरूपात आहे तसेच ते विस्कळीत स्वरूपाचे देखील आहे .म्हणूनच बहुजन विचारधारेच्या सौंदर्यशास्त्राची निकड सातत्याने वाटत आली आहे .या लिखित सौंदर्यशास्त्राची मांडणी .मांडणी करण्याची पूर्वतयारी म्हणून चंद्रकांत बाबर यांच्या ग्रंथाकडे पाहावे लागेल, .असे परखड मत अहिल्या नगरचे साहित्यिक व समीक्षक डॉ.संजय बोरुडे यांनी मांडली.गोमंतक मराठी अकादमी गोवा व साहित्याक्षर प्रकाशन अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली येथील महत्वाचे समीक्षक चंद्रकांत बाबर यांच्या “पर्यायी मांडणीच्या हस्तक्षेपांचे अधोरेखन…” समीक्षा ग्रंथावरील. गोमंतक मराठी अकादमी गोवाच्या पर्वरी येथील मराठी भवन मध्ये संपन्न झालेल्या चर्चा सत्रात ते बोलत होते.

सुरुवातीला सांगली येथील समीक्षक व कवी चंद्रकांत बाबर यांनी या ग्रंथामागची भुमिका स्पष्ट करताना, कॉ . शरद पाटील यांनी अब्राम्हणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र या त्यांच्या ग्रंथात अभिजन साहित्यापेक्षा बहुजनांचे साहित्य हे कसे सकस आणि महत्वाचे आहे, याची मांडणी केलेली आहे . या पर्यायी सौदर्यंशास्त्राची आवश्यकता लक्षात घेवूनही आजपर्यंत ती पुढे गेलेली दिसत नाही . हे लक्षात घेऊन आपणच हा प्रयत्न का करू नये असे वाटल्याने व ब्राह्मणी सौंदर्यशास्त्राच्या विस्तार वाटा हा मोठा प्रकल्प हाती घेतानाच त्याची पूर्वतयारी म्हणून काही या वैचारिक पार्श्वभूमीवर टिकतील अशा कलाकृतीवर लिहिलेले लेख एकत्र करून सदर ग्रंथाची निर्मिती झाली. असे चंद्रकांत बाबर यांनी स्पष्ट केले .
यानंतर अंबाजोगाई येथील समिक्षीका रचना यांनी या पुस्तकावर चर्चा करताना , ‘ या ग्रंथात करण्यात आलेली मांडणी प्रत्येकाने वाचायला हवी. या समीक्षा ग्रंथात अनेक महत्वाच्या लेखकांच्या साहित्यकृतीची विवेचक अशी चिकित्सा चंद्रकांत बाबर यांनी केलेली आहे. हा ग्रंथ विकत घेऊन त्यावर चिंतन केले पाहिजे. असे सांगितले तर चर्चासत्राचे अध्यक्ष व माजी संपादक प्रभाकर ढगे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात बाबर यांच्या ग्रंथाचा ऊहापोह करताना, समकालातील हा अत्यंत मौलिक ग्रंथ असून बाबर यांच्या ग्रंथाला गोवा विद्यापीठात सेवारत असलेले प्रसिद्ध तुलनाकार डॉ . आनंद पाटील यांची विचक्षण प्रस्तावना लाभली आहे . यातच बाबर यांच्या ग्रंथाची योग्यता दिसून येते. विशेष म्हणजे आताचा काळ हा बहुजनांच्या एकूण सर्व स्तरीय स्वातंत्र्यासाठी अभी जनी व्यवस्थेत हस्तक्षेप करायला लावणार आहे. अशा काळात बहुजनांच्या बाजूने पर्यायी मांडणी करणारा हा ग्रंथ महत्त्वाचा ठरेल असे मतही त्यांनी व्यक्त केले. उदय ताम्हणकर यांनी आभार मानले. स्वागत व प्रास्ताविक अशोक घाडी यांनी केले. यावेळी गोव्यातील महत्त्वाचे साहित्यिक उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??