ताज्या घडामोडी
देशी जनावरांचे संवर्धन करणारे येडे उपाळेचे सुपुत्र सुधीर अभंग.. देशी गायीचे केले डोहाळे जेवण आणि दिला भूत दयेचा संदेश

कडेगाव
देशी जनावरांच्या संवर्धन करणारे येडे उपाळेचे सुपुत्र सुधीर अभंग यांनी आपल्या देशी गाईचे डोहाळे जेवण साजरे केले. प्राणी मात्रांवरती प्रेम करा आणि त्यांच्या संवर्धन करा ही बुद्धांची महावीरांची आणि तुकडोजी महाराजांची शिकवण सत्यात साकारणारे सुधीर अभंग हे उत्तम पशुपालक म्हणून गणले जात आहेत.
एकीकडे देशी जात संकटात आली असताना दुसरीकडे मात्र स्वतःच्या मुलाबाळाप्रमाणे देशी गाईचे संगोपन करणाऱ्या सुधीर अभंग खऱ्या अर्थाने गोपालक असल्याचे आपल्यासमोर येते अभंग हे आपल्या शेतीमध्ये सुद्धा विविध प्रयोग करण्यामध्ये प्रसिद्ध आहेत.गावातील महिलांना बोलावून त्यांच्या हस्ते पूजन वगैरे करून कार्यक्रम ठेवून त्यांनी आपल्या या देशी गायीचे डोहाळे जेवण साजरे केले त्यांच्या या उपक्रमाबद्दल या परिसरातील सर्व पशुपालक आणि ग्रामस्थातून कौतुक व्यक्त होत आहे