ताज्या घडामोडी

शेडगेवाडी ते चांदोली धरण पर्यंत च्या हॅम रस्त्याचे काम गतीने पूर्ण करा.

लोकांच्या अडचणींची सोडवणूक करा. वाहतुकीला अडथळा होणार नाही याची दक्षता घ्या..आमदार सत्यजित देशमुख.

शिराळा प्रतिनिधी

शिराळा मतदार संघातील पश्चिम भागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा असणाऱ्या शेडगेवाडी ते चांदोली धरण पर्यंत च्या हॅम रस्त्याच्या कामांची पाहणी आमदार सत्यजित देशमुख यांनी केली. चांदोली पासून शेडगेवाडी पर्यंत प्रत्येक गावात जाऊन कामाची पाहणी केली.प्रकल्पाचे अधिकारी एम. एस आय डी सी चे कार्यकारी अभियंता ए. डी. सागर यांच्या समवेत केली. आमदार सत्यजित देशमुख यांनी ठिक ठिकाणी लोकांच्या असणाऱ्या रस्त्याच्या कामां बाबत अडचणी प्रत्यक्ष समजावून घेत त्यावरती मार्ग काढण्याच्या सूचना संबंधिताना दिल्या. वाहतुकी साठी येणाऱ्या अडचणी तसेच पावसाळ्या दरम्यान होणारी परस्थिती लक्षात घेऊन दुरुस्ती करण्यात यावी असे आदेश दिले. तसेच कामाची गती वाढवून लवकरात लवकर काम मार्गी लावण्यात यावे अशा सूचना केल्या. रस्त्या लगत असणाऱ्या झाडाची तोडणी न करता काय उपाय योजना होईल याचा जास्तीचा प्रयत्न करावा अशी भूमिका मांडली. आमदार सत्यजित देशमुख यांनी मांडली. आवश्यक ते नुसार गावा जवळ रस्त्याची रुंदी वाढवावी अशा सूचना त्यांनी केल्या. रस्तालगत असणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतातून शेत माल बाहेर काढता आला पाहिजे त्यासाठी शेतकऱ्यांना शेत रस्त्यासाठी पर्याय ठेवा अशा सूचना मांडल्या. ग्रामस्थांच्या मागणी नुसार रस्त्या बाबत योग्य दुरुस्ती करावी अशा सूचना केल्या. यावेळी ग्रामस्थांनी येणाऱ्या अडचणी अधिकाऱ्यासमोर मांडल्या. त्याची तत्काळ सोडवणूक करण्यात यावी असे आदेश देशमुख यांनी दिले.
यावेळी भाजपा नेते हणमंतराव पाटील , हिंदुराव नांगरे, राम माने, बाजीराव शेडगे, विलास पाटील, सर्जेराव पाटील, विजय चौगुले, शाम मराठे, दीपक नेर्लेकर, काका आमने, कृष्णा पाटील, तानाजी नाटूलकर,रवींद्र शेडगे आदी मान्यवर, ग्रामस्थ,पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??