ताज्या घडामोडी

*न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडेत वक्तृत्व स्पर्धा संपन्न

शैक्षणिक व सामाजिक संस्था, सैतवडे संचलित न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे प्रशालेत लोकमान्य टिळक पुण्यतिथी व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम.सिद्धी लांजेकर यांनी उभायतांच्या प्रतिमाचे पूजन करून त्यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. त्यानंतर *
*इ.5वी ते इ.7वी व इ.8 वी ते इ.10 वी**
अशा दोन गटांत घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत अनुक्रमे 29 व 46 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन लो. टिळक व अण्णाभाऊ साठे यांचे बालपण, शिक्षण, सामाजिक, राष्ट्रीय व साहित्यिक कार्याचा मागोवा घेत आपल्या वक्तृत्वला पैलू पाडण्याचे प्रयत्न केले.या स्पर्धेचे परीक्षण प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका सौ. नसिम शेकासन मॅडम व कलाध्यापक श्री.रमेश गंधेरे सर यांनी केले. सूत्रसंचालन व आभार शिक्षक श्री. नितीन जाधव यांनी केले. कार्यक्रमाची फोटोग्राफी कुमार अनुराग महाकाळ, शाळेचा विद्यार्थी प्रतिनिधी- कुमार ओंकार कदम व शिक्षिका संज्योत खेडेकर मॅडम यांनी केली. स्पर्धेचा रिझल्ट पुढीलप्रमाणे *
*इ.5वी ते इ.7वी च्या गटात** 1)प्रथम क्रमांक -कुमारी शमिका संतोष थुळ इ.7वी गट-कीर्ती
2)द्वितीय क्रमांक-कुमारी आरोही अनिल बंडबे इ.6 वी गट -कीर्ती
3)तृतीय क्रमांक- कुमार आराध्य अमोल लिंगायत इ.5वी गट कीर्ती
उत्तेजनार्थ क्रमांक – 1)कुमारी अविष्का रमेश गंधेरे इ.5वी गट विवेक
2)कुमारी पांचाळ सई उमेश इ. 5वी गट -विवेक
3)कुमारी जाधम रिना अविनाश इ. 6वी गट-प्रताप
*इ.8वी ते इ.10 वी या गटात*
1)प्रथम क्रमांक कुमाऱी मनस्वी मनोहर किंजळे इ.10वी गट- कीर्ती
2)द्वितीय क्रमांक कुमारी रिया नितेश महाकाळ इ.9वी गट- कीर्ती
2)द्वितीय क्रमांक कुमारी मंजिरी राजेंद्र चौघुले इ.10 वी गट- प्रज्ञा
3)तृतीय क्रमांक कुमारी साक्षी चंद्रकांत थुळ इ.10वी गट- विवेक
3)तृतीय क्रमांक कुमारी आर्या प्रदिप ठीक इ.8वी गट- प्रज्ञा
उत्तेजनार्थ 1)कुमारी साजेरी सुरेश शिरगावकर इ.8 वी गट-प्रताप
2)कुमारी रक्षिता लक्ष्मण भुवड इ.8 वी गट-प्रज्ञा
3)कुमारी अनुष्का संदिप काताळे इ. 8वी गट -प्रताप.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व गटांतील विद्यार्थी तसेच सेवाजेष्ठ शिक्षक श्री. संतोष चव्हाण सर, शिक्षकेत्तर कर्मचारी श्री. विनायक कोळवणकर व श्री. रविंद्र लवंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??