ताज्या घडामोडी

बेलापूर महाविद्यालयात कर्मयोगी मुरलीधर खटोड जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत रुपाली गिरवले आणि कोमल औटे प्रथम

Spread the love

बेलापूर-येथिल कला व वाणिज्य महाविद्यालय बेलापूर आणि कर्मयोगी मुरलीधर खटोड जनलक्ष्मी पतसंस्था बेलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मयोगी मुरलीधर खटोड जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत अहमदनगरच्या न्यू लॉ कॉलेजची विद्यार्थीनी रुपाली गिरवले आणि ज्ञानेश्वर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कोमल औटे यांनी प्रथम क्रमांक विभागून रोख 3000रु., सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र ,पुस्तके ,फिरता करंडक , पटकावला.द्वितीय क्रमांक राहाता महाविद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी भागवत 2000रु.रोख, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक, तर तृतीय क्रमांक न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अहमदनगरचा विद्यार्थी प्रविण काजळे (रोख 1000 रु.सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक) याने मिळविला.या स्पर्धेत 10 उत्तेजनार्थ रोख रु.200 व प्रमाणपत्र सहित पारितोषिके दिली गेली.यामधे योगिता कसबे(अशोकनगर महाविद्यालय),महेश उशीर (एस.एस.जी.एम महाविद्यालय कोपरगाव),राजश्री आंधळे (गृह विज्ञान व संगणक महिला महाविद्यालय लोणी ), योगेंद्र मुळे(के.जे.सोमय्या महाविद्यालय कोपरगाव), राजेश्वरी आंबेकर(जे.टी.एस.ज्यूनियर कॉलेज बेलापूर), (वैष्णवी माकोणे(अशोकनगर महाविद्यालय),साक्षी भांबरे(सी.डी.जैन महाविद्यालय श्रीरामपूर),तनुजा गुडधे(लोकनेते बाळासाहेब थोरात महाविद्यालय तळेगाव दिघे),हर्षदा शिंदे( जिजामाता महाविद्यालय भेंडा), अनुजा गाढे( न्यू लॉ कॉलेज अहमदनगर यांनी उत्तेजनार्थ पारितोषिके मिळवली..या जिल्हास्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे हे पहिले वर्ष असून जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील एकूण 35 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.परीक्षक म्हणून महाराष्ट्र वक्तृत्व परिषदेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.शिवराज आनंदकर आणि कोल्हापूरहून आलेले महाराष्ट्र वक्तृत्व परीषदेचे उपाध्यक्ष प्रा.गणेश लोळगे यांनी सदर स्पर्धेचे परीक्षक म्हणून काम पाहिले.
स्पर्धेचे उद्घाटन बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गणपतलाल मुथ्था यांनी केले.यावेळी व्यासपीठावर बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अशोकनाना साळुंके, खजिनदार हरिनारायण खटोड, सचिव अॅड.शरद सोमाणी ,दिपक सिकची,राजेंद्र खटोड,श्रीवल्लभ राठी, हरिश्र्चंद्रपाटील महाडिक, बापुसाहेब पुजारी, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड,प्रा.हंबीरराव नाईक, कर्मयोगी मुरलीधर खटोड जनलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन रविंद्र खटोड, संचालक अभिषेक रांका,प्रशांत खटोड ,रमेश कुटे,गणेश मुंडलीक,दिवाकर कोळसे,पत्रकार प्रा.ज्ञानेश गवले,पत्रकार नवनाथ कुताळ , पत्रकार किशोर कदम,डॉ.संजय कदम , महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे आदि मान्यवर उपस्थित होते.
वक्तृत्व स्पर्धा आणि पारितोषिक वितरण समारंभासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, बॅक अॉफ महाराष्ट्र बेलापूरचे शाखाधिकारी अजय बोरसे,पोलिस औट पोस्ट बेलापूरचे हेड कॉन्स्टेबल अतुल लोटके , पोलिस कॉन्स्टेबल गणेश भिंगारदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेलापूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव अॅड.शरद सोमाणी होते.यावेळी व्यासपीठावर गणपतलाल मुथ्था,अशोकनाना साळुंके, बापुसाहेब पुजारी,राजेंद्र खटोड, महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन राजेश खटोड,रविंद्र खटोडअरविंद शहाणे, अनिल पवार,भरत साळुंके,प्रसाद खरात , गणेश राठी,मारुती बिंगले,निखिल नगरकर ,अभिजीत रांका उपस्थित होते.या वेळी चेन्नयी येथे झालेल्या आंतरविद्यापीठीय बॉल बॅडमिंटन स्पर्धेत गौरव भिंगारदिवे आणि ऋषीकेश नवले तसेच जनलर चॅम्पियन शिपचा किताब मिळवलेला अभय गाढे या विद्यार्थ्यांचा सन्मान प्रमुख पाहुण्यांच्या शुभहस्ते करण्यात आला.सदर प्रसंगी महाविद्यालयातील नैपुण्य मिळविलेल्या शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रिडा क्षेत्रातील विविध पारितोषिके विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.विलास गायकवाड , डॉ.संगीता वडितके यांनी केले.कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष प्रा.निजाम शेख,स्वागताध्यक्ष प्रा.प्रकाश देशपांडे , वक्तृत्व समिती संयोजक डॉ.बाळासाहेब बाचकर, डॉ.अशोक माने, विद्यार्थी प्रतिनिधी प्रफुल्ल खपके व विद्यार्थिनी प्रतिनिधी कोमल भांड तसेच विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. संजय नवाळे ,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. विठ्ठल सदाफुले, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. विनायक काळे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा.चंद्रकांत कोतकर,प्रा.रुपाली उंडे, डॉ.बाबासाहेब पवार, डॉ.भाऊसाहेब पवार,प्रा.सतिश पावसे,प्रा.अशोक थोरात,प्रा.सुनिल विधाटे,प्रा.मंगल दिवे कार्यालयीन अधिक्षक संदेश शाहिर, कृष्णा महाडिक, अनिता चिंचकर,संदिप चौधरी, रामेश्वर पवार,अनिल पवार ,अण्णा ओहोळ, नानासाहेब तुवर ,सारिका चव्हाण,सुहाना शेख,निकीता गागरे,मनिषा मुसमाडे,कावेरी गायके,विशाल गाढे प्रिया थोरात,शितल शिंदे,वैष्णवी भागवत,दिपाली खर्डे,विजया फलके,श्वेता थोरात,सुरैय्या शेख,कल्याणी बत्तीसे,शुभांगी बिगरे आदिंनी परिश्रम घेतले.सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी -विद्यार्थिनी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!