लायन्स क्लब ऑफ सफाळेचा पदग्रहण समारंभ उत्साहात पार पडला

सफाळे , लायन्स क्लब ऑफ सफाळेचा पदग्रहण (इन्स्टॉलेशन) समारंभ शनिवारी (दिनांक 26 ) सफाळे येथील रोहिदास गार्डन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी तथा इन्स्टॉलिंग ऑफिसर म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन मनोज बाबुर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून फर्स्ट डिस्ट्रिक्ट वाईस गव्हर्नर लायन नटवर बँका व गायत्री बँका, सेकंड डिस्ट्रिक्ट वाईस गव्हर्नर लायन विकास सराफ यांची उपस्थिती होती. आगरी सेना कार्याध्यक्ष चंदुलाल घरत, तसेच रिजन चेअर पर्सन लायन अतुल दांडेकर, झोन चेअर पर्सन लायन प्रमोद पाटील व, लायन सचिन गांधी, डिस्ट्रिक्ट मेंबरशिप चेअरपर्सन लायन सुनील लावटी, लायन श्रद्धा मोरे, लायन किरण परिहार, डिस्ट्रिक्ट लायन क्वेस्ट चेअरपर्सन लायन नितीन पुरकर, डिस्ट्रिक्ट सॅटेलाईट को-ऑर्डिनेटर लायन हनुमंत भोसले, लायन रंजना म्हात्रे, वसई युनिक क्लबचे अध्यक्ष लायन निलेश घरत, केळवे क्लबचे अध्यक्ष लायन कृषील राऊत, लायन किशोर पाटील यांच्यासह विविध गावांतील सरपंच, सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी आणि लायन्स सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लायन प्रमोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या समारंभात नवनिर्वाचित अध्यक्ष लायन मनोज म्हात्रे आणि त्यांच्या टीमला पदाची शपथ देण्यात आली. यावेळी मावळते अध्यक्ष लायन प्रमोद पाटील यांनी आपल्या कार्यकाळातील आढावा ‘प्रगती कार्ड 2024-25’ या स्वरूपात प्रकाशित केला.कार्यक्रमात लायन निकेश वर्तक, अॅड. लायन नवीन घरत, लायन महेंद्र ठाकूर आणि लायन अल्पेश घरत यांना ‘बेस्ट लायन ऑफ द इयर’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. महिलांसाठी सुरू असलेल्या शिवणकाम प्रशिक्षण वर्गातील पाच महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच क्लबमध्ये नव्याने सहभागी झालेल्या 10 सदस्यांना औपचारिक शपथ देण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्ष लायन मनोज म्हात्रे, सेक्रेटरी जतिन कदम, खजिनदार कुंदन राऊत यांनी शपथ घेऊन याप्रसंगी अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप, स्वच्छ जल प्रकल्प, स्काऊट अँड गाईड युनिफॉर्म वाटप, डिस्ट्रिक्ट ट्री प्लांटेशन आणि कारगिल विजय दिन साजरा करण्यासारख्या पाच उपक्रमांचा शुभारंभ घोषित केला.सचिन वर्तक यांनी आभाप्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सुरळीत सूत्रसंचालन लायन जतिन कदम आणि प्रतिभा कदम यांनी केले.