उल्हासनगर येथील साहित्यिक व कवी प्रा.प्रकाश माळी सर महाकवी कालिदास साहित्यिक गौरव पुरस्काराने सन्मानित

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ संचलित जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद यांच्या वतीने महाकवी कालिदास स्मृती प्रित्यर्थ रिमझिम काव्य संमेलन व साहित्यिक सन्मान सोहळा नाशिक येथील कालिका माता मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आला होता.यावेळी कविता सादरीकरण तसेच साहित्यिक क्षेत्रातील भरीव कार्याची दखल घेऊन उल्हासनगर येथील साहित्यिक व कवी,जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेचे कार्यवाह,मुंबई माळी समाज मंडळाचे अध्यक्ष आणि ठाणे येथील विद्या प्रसारक मंडळाच्या बांदोडकर विज्ञान महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्रा.प्रकाश माळी सर यांना *महाकवी कालिदास साहित्यिक गौरव पुरस्कार २०२५* संमेलनाच्या अध्यक्षा सौ.लतिकाताई चौधरी जेष्ठ साहित्यिक,प्रमुख पाहुणे उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील,खजिनदार अर्जुन पाटील तसेच जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ.प्रशांत पाटील यांच्या शुभ हस्ते व परिषदेचे सचिव प्रमोद कुंवर,जेष्ठ साहित्यिक डॉ.नरेंद्र खैरनार यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.