प्रशासकीय सेवेत आशेचा किरण म्हणजे “किरण गित्ते साहेब IAS : मा श्री किरण गित्ते साहेब

मानवी जीवन हे अनमोल आहे.याचे वर्णन सर्व धर्म ग्रंथांनी,संतांनी मोठ्या प्रमाणावर केले आहे.शेक्सपियर म्हणतो की हे जग म्हणजे एक रंगमंच आहे.या रंगमाचावर प्रत्येकाला वेगवेगळ्या भुमिका पार पाडाव्या लागतात.ज्या व्यक्तिला मिळालेल्या भुमिकेचे सोने करता येते.इतिहास अस्याच लोकांची नोंद घेतो.लोकशाहीत कार्यकारी मंडळाला अत्यंत महत्वाचे स्थान आहे.यात नौकरशहाचे अनन्य साधारण महत्व आहे.लोकशाहीची यशस्विता ही कर्तव्यदक्ष व प्रामाणिक नौकरशहावरच अवलंबुन आहे.त्या साठी त्या अधिका-याला आचार,विचार व उच्चार यात समन्वय ठेवता आला पाहिजे व आपल्या प्रशासनात सतत परिस्थितीची जाण व कर्तव्याचे भान असले पाहिजे.असेच परिस्थितीची जाण व कर्तव्याचे भान असणारे मोठे प्रशासकीय व्यक्तिमत्व म्हणजे मा. किरण गित्ते साहेब IAS होत.
बीड जिल्हा तसा सर्वार्थाने प्रसिद्ध असलेला जिल्हा आहे.त्यात बारा ज्योतिर्लिं गापैकी वैद्यनाथ हे एक ज्योतिर्लिंग असलेल्या परळी तालुक्यात बेलंबा या छोट्या गावी एका शेतकरी कुटुंबात आई श्रीमती इंदुमतीताई व वडील दिनकरराव यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला.लेकराचे पाय पाळण्यात दिसतात म्हटल्या प्रमाणे लहानपणापासूनच त्यांना समाजासाठी काही तरी करावे असी ओढ होती.त्यासाठी सर्व प्रथम आपण चांगले शिक्षण घेवुन पायावर उभे टाकावे असी मनासी खुणगांठ बांधुन शिक्षण घेतले व शिक्षण घेवुन प्रशासकीय क्षेत्रातील ज्या पदाला सर्वाधिक महत्त्व आहे ते आय.ए.एस.(IAS) चे पद त्यांनी प्राप्त केले.हे पद मिळाले म्हणून त्यांनी आपल्या मातीशी असलेली नाळ मात्र कधीच तुटु दिली नाही.प्रभू रामचंद्र म्हणाल्या प्रमाणे ‘जननी आणि जन्मभूमीच्या’ सेवेतच त्यांनी स्वर्ग मानला.त्यांनी सर्वप्रथम आपल्या प्रशासकीय सेवेला प्रारंभ केला तो त्रिपुरा राज्यातुन.तीथे त्यांनी अनेक पदावर कार्य केले.ज्यात जिल्हाधिकारी पदाचा ही समावेश होतो.आपल्या पहिल्याच प्रशासकीय पर्वात त्यांनी पायाभूत सूविधा उपलब्ध करून दिल्या.आरोग्य सूविधांमध्ये प्रचंड बदल घडविले.राज्याला औद्योगिक दृष्टिने समृद्ध करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.जे निर्णय घेतले ते लोकाभिमुख होते.त्यामुळेच त्यांची ओळख एक सक्षम व कर्तृत्ववान अधिकारी तीथे ओळख झाली आहे.त्रिपुरा राज्यात ‘प्रधानमंत्री जन धन योजना’यशस्वीपणे राबविल्यामुळे त्यांचा सन्मान देशाचे लाडके पंतप्रधान मा.ना.नरेंद्रदजी मोदी साहेब यांच्या हस्ते झाला.
अमरावती जिल्हाधिकारी , महानगर आयुक्त : पुणे पी.एम.आर.डी ए.पुणे पदांवर काम केले पुणे मेट्रो उभारणीत महत्वपूर्ण योगदान दिले.तिथे ही आपल्या कामाचा ‘गित्ते पॅटर्न’निर्माण केला.त्यांच्या अमरावती येथे केलेल्या उत्कृष्ट कार्यामुळे आज ही प्रशंसा होते.प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी ई-गव्हर्नन्सचे आदर्श माॅडेल उभे केले.याच अमरावती जिल्ह्य़ात जलयूक्त शिवार , पालकमंत्री पांदण रस्ते, जन धन योजना ही योजना प्रभावीपणे राबविल्यामुळे त्यांना महाराष्ट्र शासनाकडून ‘सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी ‘या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
सचिव : त्रिपुरा राज्यात ,सार्वजनिक बांधकाम, आरोग्य , आणि कुटुंब कल्याण,उद्योग, आणि वाणिज्य, माहिती तंत्रज्ञान विभाग त्रिपुरा सरकार म्हणून उत्कृष्ट कार्य केले व करताहेत.त्यांच्या या कार्याची दखल घेवुन ‘स्वच्छ भारत अभियान ‘अंतर्गत संपुर्ण देशातुन त्रिपुरा राज्याने प्रथम क्रमांक मिळविल्या बध्दल व ‘शहरी आवास योजना यशस्विपणे राबविल्या बध्दल त्यांचा सत्कार देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.त्रिपुरा राज्यात उद्योग,आरोग्य, सार्वजनिक बांधकाम आणि सूशासन या सारख्या अनेक विभागांची धुरा त्यांनी सक्षमपणे सांभाळत आहेत.त्रिपुरा इन्स्टिट्यूशन फाॅर ट्रान्सफाॅरमेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ही ते राज्याच्या विकासाचे नवे धोरण व रूपरेषा आखत आहेत.त्यांच्यामुळे त्रिपुरा राज्यात गुंतवणुक वाढली असून उद्योगांना गती मिळाली आहे.रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. निवडूकीची जबाबदारी ही सक्षमपणे पार पाडली आहे.
लोकनेते स्व. गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचे अत्यंत विश्वासू दिनकरराव मुंडे गुरुजी यांचे ते जावई आहेत. त्यांच्यामुळे व स्वतः गोपीनाथरावजी मुंडे साहेबांच्या सहवासात आल्यामुळे त्यांनी साहेबांचा ‘उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही,’हा मंत्र डोळ्यासमोर ठेवून कार्य करताना दिसतात.बीड जिल्ह्याचा एक सुपुत्र आपल्या कार्यकर्तृत्वाने आपले नाव देशात ,त्रिपुरा राज्यात करतोय याचा खरोखरच आम्हा सर्वांना अभिमान आहे.साहेब एवढ्या मोठ्या पदावर असले तरी वारकरी संप्रदायाचा सहवास असल्यामुळे ‘अहंकाराचा वारा’ त्यांच्या अंगाला लागलेला दिसत नाही.’ व्हावे लहानाहुणी लहाण’ या संतोक्तिप्रमाणे जिथे जशी माणसे भेटतील तसा नम्र भाव ठेवून ते जीवन जगताना दिसतात.देशात परळीचे नाव बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणून व संत जगमित्र नागा या संतामुळे प्रसिद्धीस आहे.पुढे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी या नगरीचे नाव संयुक्त राष्ट्रसंघापर्यंत नेऊन पोहोचवले.आज मा.किरण गित्ते ,IAS साहेबांच्या माध्यमातून हे नाव देशभर होताना आपण पाहतो आहोत.परळी शहर व तालुकाच नव्हे तर संपूर्ण बीड जिल्ह्याची जास्तीत जास्त प्रसिद्धी ही राजकीय क्षेत्रासाठी व धार्मिक क्षेत्रासाठी आहे.राष्ट्रसंत भगवानबाबा,मन्मथ स्वामी,आद्यकवी मुकुंदराज व अन्य अशा संत महंत व साहित्यिकांमुळे या जिल्ह्याला एक वेगळे नाव आहे. पण शिक्षण क्षेत्राच्या बाबतीत म्हणावी तेवढी प्रसिद्धी यापूर्वी नव्हती पण अलीकडे मा.किरण गित्ते साहेब,व विवेकानंद यूथ वेल्फेअर सोसायटीच्या अध्यक्षा : सौ उषाताई किरण गित्ते या कर्तुत्ववान व्यक्तित्वामुळे शैक्षणिक क्षेत्रात व प्रशासकीय क्षेत्रातही या जिल्ह्याचे नाव होताना दिसते आहे.
परळीला शैक्षणिक वातावरण म्हणावे तेवढे नव्हते.ते निर्माण करण्याचे काम अलीकडच्या काळात मा.किरण गित्ते साहेब IAS व त्यांच्या सौभाग्यवती सौ.मा.उषाताई किरण गित्ते मॅडम यांनी विवेकानंद यूथ वेल्फेअर सोसायटीच्या अंतर्गत किरण गित्ते IAS अकॅडमी,दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल , पोतदार जम्बो किड्स ,वेंडर दिल्ली वर्ल्ड पब्लिक स्कूल सह किरण गित्ते IAS अकॅडमीच्या माध्यमातून आता पर्यंत शासकीय नोकरीमध्ये औष्णिक विद्युत केंद्र, जलसंधारण, पोलीस व आरोग्य विभाग, महावितरण, महापारेषण, यू.पी.एस.सी, एम.पी.एस.सीच्या धर्तीवर जवळपास 700 ते 800 विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात शासकीय विविध पद प्राप्त केले आहेत.
राजकारणी व महाराज मंडळी निर्माण करणारा जिल्हा म्हणूनही आपण या जिल्ह्याकडे पाहत असतो.ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणूनही याकडे पाहिले जाते,पण आता ‘ विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीच्या’ माध्यमातून हे दांपत्य दर्जेदार शिक्षण देण्याचे काम करते आहे. याचा भविष्यात खूप मोठा फायदा समाजाला होणार आहे. तसेच किरण गित्ते IAS अकॅडमी’ स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली परळीत कार्य करत आहे.यातून उद्याचे किरण गित्ते साहेबांन सारखे IAS निर्माण होणार आहेत.हे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे कार्य आहे.
त्यांचा जन्मदिवस हा आज 05 सप्टेंबर 2025 म्हणजे ‘शिक्षक दिनी’ आहे. ज्या राधाकृष्णन यांनी या देशाची प्रगती ही विज्ञान व अध्यात्म यांच्या संगमातून होणार आहे असं सांगितलं होतं व तसाच विचार व पींड गिते साहेबांचा ही आहे. देशाचे भवितव्य घडविण्यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका ही शिक्षण प्रक्रियेतून घडते. त्यातही शिक्षकांची जबाबदारी ही अत्यंत महत्त्वाची असते असे सांगितले होते.तोच विचार डोळ्या समोर ठेवून गित्ते साहेब शिक्षणाचे काम करत आहेत.आणि आज शिक्षक दिनी त्यांचा जन्म कदाचित हे शैक्षणिक कार्य त्यांच्या हातून घडावे यासाठीच तर झाला नसावा ना?असा विचार निश्चितपणे मनात येऊन जातो. त्यांना अध्यात्माची ही तेवढीच आवड आहे. धार्मिक क्षेत्रातील ह.भ.प.डाॅ.न्यायाचार्य नामदेव शास्त्री सानप,ह.भ.प. तुकाराम महाराज मुंडे , ह.भ. प. अर्जुन महाराज लाड गुरुजी, ह भ प प्रभाकर महाराज झोलकर व अन्य महाराज मंडळीच्या संपर्कात ते सतत असतात.विविध धार्मिक कामात ते सक्रिय सहभाग नोंदवतात. त्यासाठी सढळ हाताने मदत करतात. कीर्तन श्रवण करतात.चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन करतात.या दांपत्याने आपल्या जन्मभूमीला जे देता येईल ते देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत.असा सर्वच क्षेत्राला गती देण्याचा *आशेचा किरण* म्हणजे किरण गित्ते साहेब आहेत.
असी परिस्थितीची जाण व कर्तव्याचे भान असणारे गित्ते साहेब होत.
मा.श्री. किरण गित्ते साहेब IAS यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा .ईश्वर त्यांचे आयू व आरोग्य आबाधित राखो व त्यांच्याकडून भविष्यात असेच सामाजिक,शैक्षणिक व प्रशासकीय कार्य उत्तरोत्तर घडत राहो असी प्रभू वैद्यनाथाच्या चरणी मनोकामना करून मी माझा शब्द प्रपंच थांबवतो.
बालासाहेब फड.. संपादक
दै.सोमेश्वर साथी,परळी (वै.)