ताज्या घडामोडी

वीज ग्राहकांच्या वाढीव वीज बिले आणि इतर अडचणी सोडवा.- विराज नाईक

शिराळा प्रतिनिधी

शिराळा तालुक्यातील नागरिकांना भरमसाठ प्रमाणात विजेची बिले वाढीव आली आहेत. त्याबाबत चरण व परिसरातील गावातील ग्रामस्थांना आलेली वाढीव विजेची बिले व इतर अडचणी बाबत वीज वितरण कंपनीच्या पणुंब्रे तर्फ वारूण येथील कार्यालयात बैठक झाली. विराज उद्योग समूहाचे अध्यक्ष विराज नाईक हे उपस्थित होते. श्री. नाईक व अधिकाऱ्यांनी लोकांच्या अडचणी समजावून घेतल्या. यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती बी. के. नायकवडी, उप कार्यकारी अभियंता लक्ष्मण खटावकर, पणुंब्रे तर्फ वारूणचे सहाय्यक अभियंता, एफ. ए. मुलाणी, विज बिल विभागाचे श्री. पाटोळे, मणदूरचे वसंत पाटील, हमीद नायकवडी, बाबासाहेब कोळसे, आलम नायकवडी, दिलीप नायकवडी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??