कणखर नेत्याला संपूर्ण महाराष्ट्र मुकला. उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अकाली जाण्याने सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी

कणखर नेत्याला संपूर्ण महाराष्ट्र मुकला.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अकाली जाण्याने सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे..माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष शिवाजीराव नाईक.
शिराळा प्रतिनिधी
शिराळा येथील संपर्क कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिराळा विधानसभा व यशवंत विविध उद्योग समूहाच्या वतीने अजित दादा पवार यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.नाईक म्हणाले,आज सकाळी महाराष्ट्र मध्ये एक अत्यंत दुःखद घटना घडली राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झालं आहे. या बातमीने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने लोकनेते होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याची खडान खडा माहिती असणारे सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारे कणखर नेते होते. त्यांचेबद्दल जनसामान्यांमध्ये मोठी आस्था होती. संघर्ष करणारे शब्दाचे पक्के व कुठल्याही परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारं व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय,सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिराळा विधानसभा व यशवंत विविध उद्योग समूहाच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आनंदराव पाटील,पाटील बंडा डांगे ,अभिजीत नाईक,विनोद पन्हाळकर ,सागर नाईक, माधवराव नाईक, सयाजी कदम पांडुरंग गायकवाड पिनू पाटील, प्रताप दिलवाले ,भरत निकम व कार्यकर्ते उपस्थित होते.



