डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार व कल्याण डोंबिवली स्पोर्टस् फोरमच्या संयुक्त विद्यमाने “नारी शक्ती एकता” जागतिक लेझीम उपक्रमांचे आयोजन
ठाणे.कल्याण( मनिलाल शिंपी) ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार व कल्याण डोंबिवली स्पोर्टस् फोरमच्या संयुक्त विद्यमाने नारी शक्ती एकता या विषयांतर्गत कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळा (१० वर्षे वयोगटावरील मुलींचे) तसेच महाविद्यालयीन युवती तसेच महिलांचे सामुहिक लेझीम सादरीकरण रविवार दि. ८ मार्च २०२६ रोजी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे सावळाराम महाराज क्रीडा संकुल, डोंबिवली पूर्व येथे घेण्याचे योजले आहे.
या प्रसंगी १० हजारांहून अधिक मुलींचे व महिलांचे तालबद्ध सामुहिक लेझीम करण्याचा मानस असून यामधून मुली व महिलांमध्ये सामुहिक ऐक्याची भावना दृढ करण्याची संकल्पना आहे. तसेच एकाचवेळी इतक्या मोठ्या प्रमाणात महिला एकत्र येवून लेझीम सादरीकरणाचा जागतिक विक्रम याप्रसंगी होणार आहे.
या सामुहिक लेझीम सादरीकरणात एकसूत्रता येण्यासाठी कल्याण डोंबिवली मधील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील एक उत्साही तरूण शिक्षक/शिक्षीका व दोन विद्यार्थिनी यांचे प्रशिक्षण दि. ०७/०२/२०२६ आणि १४/०२/२०२६ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत नेहरू मैदान, डोंबिवली पूर्व येथे घेण्यात आले. तसेच दि. ०८/०२/२०२६ आणि १५/०२/२०२६ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत रेल चाईल्ड संस्थेच्या सरस्वती मंदिर, सिंडिकेट, कल्याण पश्चिम येथे लेझीम प्रशिक्षण घेण्यात आले होते याठिकाणी शालेय विद्यार्थिनीचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या लेझीम प्रशिक्षण शिबीरात एशियाड लेझीम, दख्खनी लेझीम, बडोदा लेझीम या लेझीम प्रकारांमधील निवडक प्रकार शिकवले जाणार आहेत. तरी, महिला दिनानिमित्त होणाऱ्या सामुहिक लेझीम या अभिनव उपक्रमासाठी आपल्या माध्यमातून प्रत्येक शाळेतून लेझीम पथक तयार करण्यात यावे,आणि या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित
” नारी शक्ती एकता ” उपक्रम जागतिक उपक्रमात सहभाग घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
शाळेचा लेझीम पथकांना डोंबिवली महानगरपालिकेचे सावळाराम महाराज क्रीडा संकुल, डोंबिवली पूर्व येथे जाण्यायेण्यासाठी बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
“नारी शक्ती एकता ” जागतिक महिला दिनाचा निमित्ताने डोंबिवली येथे, जागतिक स्तरावर भव्य महिला लेझीम उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे,यासाठी पेंढारकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.उदय नाईक,निवृत्त मुख्याध्याक अंकुर आहेर,अविनाश नलावडे, तसेच स्वामी विवेकानंद शाळेचे ज्येष्ठ क्रीडा संघटक लजपत जाधव यांचा शाळेचा मुलींचे लेझीम पथक मार्गदर्शक म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहेत, हा उपकरण यशस्वी करण्यासाठी,प्रगती महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा.लक्ष्मण इंगळे,स्काऊट गाईड संस्थेचे अध्यक्ष अशोक जगताप, सचिव उगले सर,राजू घुले, मार्गदर्शक शेटे सर,प्रवीण खाडे,सुभाष गायकवाड, मुसळे सर,यांच्यासह सर्व क्रीडा क्षेत्रातील शिक्षक बंधू भगिनी, शालेय शिक्षण प्रेमी, संस्थापक, परिसरातील बहुतेक महिला संघटना मोलाचे कार्य करीत आहेत.
या जागतिक महिला लेझीम उपक्रमामध्ये पुढील प्रमाणे लेझीम पथक नृत्य सादर करतील*👆 वरील संगीताच्या तालावर शाळेत सराव घेताना खाली दिलेल्या बीटस् नुसार शिट्टीच्या सहाय्याने बदल देता येईल. यासाठी शिक्षकांनी आधी स्वतः लेझीम खेळून बदल देता येतो का, हे चेक करुन घ्या. किंवा दोन-चार मुलींना उभे करुन बदल देता येतो का हे तपासून घ्या.*
👉जिथे ‘४ बीटस् लिहीले आहे तिथे *चौथ्या बीटस् ला बदल* द्यावा आणि जिथे ‘८ बीटस् लिहिले आहे तिथे *’आठव्या बीटस्’ ला बदल* द्यावा
१) दो आवाज – ४ बीटस्
२) चार आवाज – ४ बीटस्
३) आठ आवाज – ८ बीटस्
४) आगे पिछे पाव – ८ बीटस्
५) दहिने रुख – ८ बीटस्
६) आठ आवाज (जोड्या पकडणे) – ८ बीटस्
७) हुल हुल समोरासमोर – ८ बीटस्
८) आठ आवाज – ८ बीटस्
९) आगे पिछे पाव करत गोल – ८ बीटस्
१०) आठ आवाज (उभे राहून) – ४ बीटस् (तोड)
११) आठ आवाज (बसून) – ४ बीटस्
१२) दोन ठोके (डोक्यावर व खाली छातीजवळ) – ४ बीटस्
१३) दोन ठोके (समोर व छाती जवळ ) – ४ बीटस्
१४) आठ आवाज (बसून) – ४ बीटस्
१५) आठ आवाज (उभे राहून) – ८ बीटस्
१६) आगे पिछे पाव करत (मूळ रांगेत येणे) – ४ बीटस्
१७) आठ आवाज – ४ बीटस्
१८) तालसे कदम – ४ बीटस्
१९) डबल जंप – ४ बीटस्
२०) डबल जंप लेझीम डोक्यावर – (५-६-७-८) कल्लोळ – ८ बीटस्
शेवटी सर्वांनी कंबरेतून खाली वाकून ३० सेकंद थांबणे. जेणेकरून आपल्याला लेझीम खेळताना धाप लागली असेल तर दम निघून जाईल.अशा प्रकारे सर्व नियोजन करण्यात येत आहे.तरी ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा,महाविद्यालये, महिला मंडळांनी “नारी शक्ती एकता ” जागतिक लेझीम उपक्रमामध्ये सहभाग घ्यावा, सर्व सहभागी यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
हा उपक्रम जागतिक पातळीवर नेण्यासाठी डोंबिवलीकर एक नागरिक चे संपादक आमदार श्री. रविंद्र चव्हाण यांचा अनमोल सहकार्याने, ज्यांनी लेझीम उपक्रम जागतिक स्तरावर आयोजित करण्यासाठी सतत प्रयत्न करत ही संकल्पना मांडली असे पेंढारकर महाविद्यालयाचे क्रीडा संचालक उपप्राचार्य प्रा. उदय नाईक, लझिम प्रशिक्षणाचे आयोजन करून परिसरात चैतन्य निर्माण करणारे निवृत्त मुख्याध्यापक अंकुर आहेर,अविनाश नलावडे, आपल्या शिक्षण संकुलात उत्कृष्ट लेझीम पथक तयार करून जागतिक उपक्रमात आपल्या शाळेचा मुलींचे लेझीम पथकाचा तालावर सर्व लेझीम पथक मार्गदर्शक म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहेत असे ज्येष्ठ क्रीडा संघटक लजपत जाधव विशेष परिश्रम घेत आहेत अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख क्रीडा संघटक, रस्ता सुरक्षा अभियान आर एस पी विभागीय समन्वय अधिकारी, पत्रकार डॉ. मनिलाल शिंपी यांच्याकडून देण्यात आली आहे.


