कल्याण येथे बँड पथक व आर एस पी बालसैनिकसंचलन पथक निवडचाचणीस उत्कृष्ट प्रतिसाद.

ठाणे शहर वाहतूक पोलिस उपायुक्तालय तर्फे ३६ वा रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत
कल्याण येथे बँड पथक व आर एस पी बालसैनिकसंचलन पथक निवडचाचणीस उत्कृष्ट प्रतिसाद
ठाणे:डोंबिवली( मनिलाल शिंपी)ठाणे शहर वाहतूक ३६ वा रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत, ठाणे शहर वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट साहेब यांच्या आदेशानुसार, कल्याण वाहतूक विभागाचे एसीपी किरण बलवडकर यांचे नेतृत्वाखाली,
कोळसेवाडी वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक श्री.सचिन सांडभोर,
कल्याण पश्चिम चे वरिष्ठ वाहतूक पोलिस निरीक्षक श्री.मिलिंद झोडगे व इतर अधिकारी
अंबरनाथ वाहतूक पोलीस उपनिरीक्षक श्री गवळी, उल्हासनगर वाहतूक पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरसाट, विठ्ठलवाडी वरिष्ठ वाहतूक पोलिस निरीक्षक पडवळ साहेब, यांचा उपस्थितीत अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन करणे बाबत जनजागृती करण्यासाठी शाळांमध्ये वाहतूक विषयक जनजागृती करणे व विद्यार्थ्यांना वाहतुकीबाबत शिस्त असणे अनुषंगाने ठाणे वाहतूक विभाग यांच्या वतीने आर एस पी च्या विद्यार्थ्यांची विभाग वार्षिक स्पर्धा आयोजित केली होती दिनांक 22/01/26 वार गुरुवार रोजी सकाळी 7.00 वाजता. रस्ता सुरक्षा अभियान विभागीय नोडल अधिकारी श्री. मनिलाल शिंपी यांचा मार्गदर्शनाखाली कल्याण जिल्हा समन्वय अधिकारी अनंत किनगे, विनोद शेलकर,यांचा विशेष सहकार्याने कल्याण , उल्हासनगर, अंबरनाथ बदलापूर विभागातील शाळांमध्ये आर एस पी बालसैनिकांची परेड संचलन स्पर्धा निवड चाचणी यशवंतराव चव्हाण मैदान (मॅक्सी ग्राउंड) कल्याण पश्चिम. या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेसाठी कल्याण व उल्हासनगर विभागातील खालील शाळातील विद्यार्थी व आर एस पी शिक्षक अधिकारी यांनी सहभाग घेतला.
गुरुनानक इंग्लिश स्कूल
(बँड पथक),कल्याण, पश्चिम,
डॉन बॉस्को स्कूल आधारवाडी
(बँड पथक )
रिटा मेमोरियल स्कूल
(बँड पथक )
सिद्धार्थ विद्यालय आंबिवली,कल्याण ( संचलन पथक)
सेंट जॉन हायस्कूल
(बँड पथक व संचलन पथक) डोंबिवली ,पूर्व,
नूतन ज्ञान मंदिर स्कूल
(संचलन पथक)
डॉन बॉस्को स्कूल( डोंबिवली (पूर्व) डोंबिवली पश्चिम ( बँड पथक)
डॉन बॉस्को स्कूल, सागाव,
उल्हासनगर येथील
यशवंत विद्यालय, शारदा विद्यामंदिर,पेट ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूल,
गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल बदलापूर,
गुरुकुल ग्रँड युनियन स्कूल.
वरील संचलन स्पर्धेसाठी
कोळसेवाडी वरिष्ठ वाहतूक पोलीस निरीक्षक श्री.सचिन सांडभोर, व इतर अधिकारी
कल्याण पश्चिम चे वरिष्ठ वाहतूक पोलिस निरीक्षक श्री.मिलिंद झोडगे व इतर अधिकारी
अंबरनाथ वाहतूक पोलीस उपनिरीक्षक श्री गवळी , रस्ता सुरक्षा अभियान विभागीय समन्वय अधिकारी
आर एस पी श्री.मनिलाल शिंपी कल्याण जिल्हा समन्वय अधिकारी श्री अनंत किनगे, ठाणे जिल्हा समन्वय अधिकारी जितेंद्र सोनवणे,ठाणे जिल्हाउप समन्वय अधिकारी श्री विनोद शेलकर, कल्याण तालुका समन्वय अधिकारी श्री बन्सीलाल महाजन,
आर एस पी अधिकारी श्री गोपाल राव डिक्कुला, सुरजित कौर बोन्स, रुपिंदर कौर आलुहवालिया, नूतन ज्ञानमंदिर विद्यालयाचे आर एस पी अधिकारी गोकुळ गवळे, अविनाश गीते सर, यशवंत विद्यालयाचे अमोल आहेर, आर्य गुरुकुल अंबरनाथ बदलापूर चे आर एस पी अधिकारी शिक्षक श्री.राकेश आयरेकर व विनायक ठाकरे, आर एस पी अधिकारी शिक्षक संदीप परदेशी,बँड मास्टर केतन शिंपी, व संबंधित आर एस पी अधिकारी अधिकारी यांनी परिश्रम घेत स्पर्धा नियोजनासाठी विशेष मार्गदर्शन व सहकार्य केले.


