स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांची पुण्यतिथी त्यानिमित्त त्यांच्या कार्यास अभिवादन

आज स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले यांची पुण्यतिथी त्यानिमित्त त्यांच्या कार्यास अभिवादन. शहाजीराजे भोसले यांचा जन्म दिनांक 18 मे 1594 रोजी मालोजीराजे भोसले यांच्या पोठी झाला. भोसले घराणे हे निजामशाहीतील एक पराक्रमी व प्रतिष्ठित घराणे होते शहाजीराजे यांचा प्रथम विवाह सिंदखेडराजा येथील सरदार लखोजजीराव जाधवराव यांच्या कन्या जिजाबाई यांच्याशी झाला. तर दुसरा विवाहतळबीड मोहिते घराण्यातील तुकाबाई यांच्याशी झाला. जिजाऊंपासून शहाजीराजांना थोरले संभाजी राजे व छत्रपती शिवाजी महाराज हे दोन पुत्र झाले. तर तुका बाईपासून व्यंकोजी राजे हे पुत्र झाले सोळाशे सहा साली मालोजीराजे भोसले हे मृत्यू पावले. मालोजीराजे भोसले यांना शहाजीराजे व शरीफजी राजे हे दोन पुत्र होते .दरम्यानच्या काळात निजामशाहीच्या दरबाराचे कामकाज संपवून शहाजीराजांचे चुलत बंधू संभाजीराजे व शहाजीराजांचे मेव्हणे दत्ताजी राजे जाधवराव हे निघाले असताना .खंडागळे नावाच्या सरदाराच्या एका हत्तीने धुमाकूळ घातला होता
. त्याला आटोक्यात आणताना संभाजी राजे व दत्ताजी राजे यांच्यात शाब्दिक चकमक झाली व याचे रूपांतर पुढे युद्धात झाले. यावेळी संभाजी राजे भोसले यांच्या हातून दत्ताजी राजे जाधवराव मारले गेले. तर लखोजीराजे जाधवराव यांच्या हातून संभाजी राजे भोसले मारले गेले .व येथूनच भोसले व जाधव राव यांच्या वैरास सुरुवात झाली. दरम्यानच्या काळात निजामशाहीवर मोगल व आदिलशाही यांच्या संयुक्त फौज्या चालून आल्या. यावेळी भातवडीची लढाई झाली. या लढाईत शहाजीराजे भोसले यांनी मोठा पराक्रम गाजविला व दक्षिणेच्या राजकारणात ते चांगले चमकले खऱ्या अर्थाने येथूनच शहाजीराजांच्या तेजस्वी कारकीर्दीला सुरुवात झाली. परंतु याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी राजे यांचा मृत्यू झाला. एवढे मोठे दुःख शहाजीराजांना पाचवावे लागले .परंतु शहाजीराजांच्या पराक्रमाचे कुठेच चीज होत नव्हते शहाजीराजे सतत आदिलशाही व निजामशाहीकडून लढत असत .शहाजीराजे आदिलशाहीकडे आले तेव्हा इब्राहिम आदिलशहा गादीवर होता.त्याने शहाजीराजांचा मोठा आदर सत्कार केला. 1627 मध्ये पावला व त्याच्या जागी आता मोहम्मद शहा हा सुलतान झाला. याच वेळी निजामशाहीतील वजीर मलिक अंबर मृत्यू पावला. व मोगल बादशहा शहाजान निजामशाही वर स्वारी करणार अशा वार्ताही सर्वत्र पसरल्या मुर्तुजां निजामशाहच्या आईने आता शहाजीराजांनी परत निजामशाही कडे यावे म्हणून प्रयत्न सुरू केले .व शहाजीराजे निजामशाहीत रुजू झाले मुर्तुजा निजामशाह हा हलक्या कानाचा वधाररसोड वृत्तीचा होता. त्यामुळे त्याच्या दरबारात कारस्थानास उत आला याचवेळी लखोजी जाधवराव व त्यांचे तीन पुत्र यांना निजामशहाने दरबारात बोलवून विश्वासघाताने त्यांचा खून केला. शहाचे हे विश्वासघाती कृत्य पाहून शहाजीराजे हाकून गेले.. व त्यांनी मोगली सरदार अजून खान यांच्याशी वाटाघाटी सुरू केल्या .याच वेळी निजामशाहीतील सरदार फतेखान याच्या फितुरीमुळे निजामशाही मोघलांच्या घशात जाणार हे. शहाजीराजांना स्पष्टपणे दिसत होती. आता निजामशाही वाचवण्याचा निर्णय शहाजीराजांनी घेतला.व कोकणातून निजामशाहीच्या वंशातील एक मुलगा शोधून काढला .व त्यास जुन्नर जवळच्या पेमगिरी या किल्ल्यावर नवा निजामशाह म्हणून घोषित केले. परिणामी आता शहाजीराजांचे मोगलांची उघड शत्रुत्व सुरू झाले .याशिवाय आदिलशाही व मुघल यांच्यात उभय पक्षी तह होऊन निजामशाही बुडविण्याचा त्यांचा इरादा पक्का झाला. आता पावसाळा सुरू झाला तरीही मोगल व आदिलशाही फौज्या शहाजीराजांवर चालून आल्या. मोठा संघर्ष घडून आला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही शहाजीराजेंनी पाच-सहा महिने संयुक्त फौज्यांची टक्कर दिली .शेवटी त्यांची शक्ती अपुरी पडली त्याने निर्माण केलेल्या निजामशहासह ते मोघलांना शरण गेले. दक्षिणेतील राजकारणात एका मराठा सरदाराने केलेले हे अभूतपूर्व धाडस होते .त्याचा शेवट जरी चांगला झाला नसला तरी मराठ्यांच्या दृष्टीने हे धाडस अबूतपूर्व होते. इथूनच स्वातंत्र क्रांतीची बीजे रवली गेली यानंतर शहाजीराजांनी रणदुल्ला खान या सरदारमार्फत आदिलशाहीत रुजू झाले .यानंतर आदिल शहाणे त्यांना कर्नाटकातील कामगिरीवर पाठवले. इथून पुढे शहाजीराजांच्या दैदीप्यमान कारकर्दीचा दुसरा खंड सुरू झाला. विजयनगरच्या आस्था नंतर त्यांच्या राज्याच्या प्रांतिक सुभेदाराने स्वातंत्र पुकारून लहान लहान राज्यांची स्थापना केली होती .यांना शहाजीराजांचा भविष्यात आधार झाला इसवी सन 1637 ते 1640 या कालावधीत आदिलशाही सरदार र नंदूला खान व शहाजीराजे यांनी कर्नाटकात तीन स्वाऱ्या केल्या. पहिल्या स्वारी त्यांनी एक्केरीच्या नायकाच्या अर्धे राज्य व 18 लक्ष होऊन खंडणी घेतली .दुसऱ्या स्वारीत अफजल खान त्यांच्याबरोबर होता. त्याने शिरा यांच्या कस्तुरी रंगास विश्वासघाताने ठार करून त्याचा किल्ला घेतला याचवेळी शहाजीराजांनी केपगोंडा यांनायकाकडून बंगळूर काबीज केले . रणदूलाखानाने बंगळूर चा कारभार शहाजीराजांना सांगितला पुढे बंगलोर हेच राजांच्या जहागिरीचे मुख्य ठिकाण झाले. या स्वारी श्रीरंगपट्टण ,मधुरा ,कावेरी पटनम इत्यादी ठिकाणचा नायकाने शरणागती स्वीकारून आदिलशास मोठी खंडणी दिली. तिसऱ्या स्वारीत बसव पट्टणम नायकाचा पराभव करण्यात आला व चिकन हळी, बदलापूर इत्यादी ठिकाणी काबीज करण्यात आली. रंदूला खान विजापूरला परत आल्यानंतर. कर्नाटकात शहाजीराजे हेच मुख्य आदिलशाही सेनानी म्हणून वावरत होते. याच काळात सण 1637ते 40 या दरम्यान जिजाबाई व शिवाजी राजे यांनी त्यांच्यासमवेत वास्तव्य केले. बंगलोरस त्यांनी एखाद्या राजाला शोभेल असा सरंजाम व दरबार तयार केला .हिंदू नायकांच्या वकील त्यांना भेटू लागले सन 1643 मध्ये रन्दुल्ला खान यांचा मृत्यू झाला. आणि त्यांची जागा आता मुस्तफा खान या सेनानी घेतली .पेनुकोंडा च्या स्वारीत मुस्तफा खान व शहाजीराजे यांच्यात विदृष्ट आले .पुढच्या वर्षी मुस्तफा खान व शहाजीराजे यांनी रूप नायकाच्या जिंजी किल्ल्याची वेढा दिला. याच वेढ्याच्या प्रसंगी कुतुबशाहशी संधान बांधल्याचा आरोप ठेवून खाणाने शहाजीराजास 25 जुलै 1648 रोजी विश्वासघात आणि कैद केले. शहाजीराजांना विजापूरला आणण्यासाठी अफजल खान या सरदाराची नेमणूक केली. लवकरच मुस्तफा खान मृत्यू पावला या वर्षाच्या शेवटी जिंजी आदिलशहाने जिंकून घेतली वीस कोटीची संपत्ती आदिलशाला प्राप्त झाली. ही प्रचंड संपत्ती व कैदी शहाजीराजांना घेऊन अफजल खान विजापुरी दरबारात दाखल झाला. दरम्यान आदिलशहाने शहाजीराजांच्या महाराष्ट्रातील पुणे जहागिरीवर व कर्नाटकातील बंगळूर जहागिरीवर आपल्या फौज्या पाठविल्या. यावेळी कर्नाटकात संभाजी राजे व व्यंकोजी राजे व महाराष्ट्रात शिवाजी राजे यांनी मोठ्या पराक्रमाने ह्यफौजा परतवून लावल्या. अशाप्रकारे जहागिरी जप्त करण्यात अदीलशलायश आले नाही. याचवेळी शिवाजी महाराजांनी दक्षिणेचा मोगल सुभेदार शहजादा मुरादबक्ष यांचे ही दडपण आदिलशाहीवर आणण्याचा प्रयत्न केला .मुरादने त्यास चांगला प्रतिसाद दिला आता आदिलशहाला शहाजीराजांची सुटका करणे वाचून पर्याय राहिला नाही. दिनांक 16 मे 1649 रोजी शहाजीराजांची मुक्तता झाली. कैदेतून सुटका झाल्यावर कर्नाटकातील रायचूर दुआबातिल कनक गिरी प्रदेशात बरीच वर्षे शहाजीराजे व त्यांचे पुत्र संभाजी राजे आणि वास्तव्य केले.या युद्धात आदिलशाहीच्या वतीने शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजविला. आणि कुतुबशाहकडून नवलक्ष होनांचा दंड वसूल केला. पुढे सन १६५४ साली कनकागिरीच्या नायकावर अफजल खान व संभाजी राजे याणि संयुक्त मोहीम काढली. असता संभाजी राजे तोफेच्या गोळ्याने ठार झाले हा शहाजीराजांच्या जीवनातील खूप मोठा आघात होता.अफजलखानाने संभाजी राजांना हेतू परस्पर वेळेवर मदत न केल्यामुळे त्यांना प्राणास मुकावे लागले असा प्रवास त्या काळी निर्माण झाला .या गुन्ह्याचे प्रशिक्षित पुढे शिवाजीराजांनी खानास दिले. याच वेळी महाराष्ट्रात शिवाजीराजांचे स्वराज्याचे उद्योग चालले होते. यावेळी शहाजीराजांनी शिवाजी शिवाजी राजांना उघड पाठिंबा दिला नाही. तथापि आपण जे करू शकलो नाही ते आपला पुत्र करत असल्याचे पाहून त्यांना अंतर्यामी आनंद वाटत होता. सन 1662 मध्ये शहाजीराजे महाराष्ट्रात आल्यानंतर आपल्या पुत्राची कामगिरी पाहून त्यांना मोठा आनंद झाला. शिवाजी राजे जिजाबाई व शहाजीराजे यांनी अनेक योजना राबवल्या .महाराष्ट्रातून कर्नाटकात गेल्यावर आले आदिलशहाने शहाजीराजांना बेतनूरच्या नायकावर स्वारीसाठी पाठविले बेदनूरच्या नायकाला शरण आणून. सॉरी वरून परत असताना शिमोगा जिल्ह्यातील हेदगिरी या गावी त्यांचा मुक्काम होता. या मुक्कामात ते शिकरिसाठी बाहेर पडले असता दिनांक 23 जानेवारी 1664 या दिवशी घोड्यावरून पडून त्यांचा अपघाती मृत्यू झाला. अशाप्रकारे दक्षिणेतील निजामशहाच्या पदरी इतरा सरदारांप्रमाणे शहाजीराजे इतर सरदारांहून अनेक बाबतीत वेगळे वाटतात.या शाही कडून त्या शाही कडे असा राजकीय प्रवास करत असताना. शहाजीराजांनी स्वतंत्र शाही स्थापण्याचा आणि मोगल व आदिलशहा यांना शह देण्याचा प्रयत्न केला .कर्नाटकात गेल्यानंतर बंगळूर हेच त्यांच्या जहागिरीचे मुख्य ठिकाण बनले. त्या शहराची वाढ त्यांच्या कार्य काळापासून सुरू झाली .बंगलोर मध्ये राजदरबारी थाट निर्माण केला. कर्नाटकातील अनेक नायकांचे वकील त्यांना भेटत असत .आणि बराच वेळा राजकारणाची खलबते तिथेच होत महाराष्ट्र व कर्नाटक अशा दोन ठिकाणी शहाजीराजांनी जहागीर मिळवली होती .निजामशाहीची स्थापना करून मोघलांची टक्कर देत असता चाळीस हजार सैन्य तयार केले होते. पुढे ते आपल्या निवडक सैन्या निशी कर्नाटकात गेले. तेथे त्यांनी सामर्थ्यशाली फौज उभी केली. त्यांच्या खाजगी घोडदळात 3000 घोडेस्वार होते. गोव्याचा व्हाईसरॉय सन 1644 मध्ये लिहितो की शहाजीचे वार्षिक उत्पन्न 20 लाख 75 हजार होन इतके आहे.आपल्या अमलाखाली शहाजीराजांनी विद्या व कला यांना आश्रय देऊन. विजयनगरच्या साम्राज्याने निर्माण केलेली हिंदू संस्कृती परंपरा पुनरुज्जीवित केली .
शहाजीराजांच्या कामगिरीच्या गौरव करताना डॉक्टर बाळकृष्ण आपल्या ‘शिवाजी द ग्रेट या ग्रंथात’ म्हणतात शहाजी महाराजांच्या पदरी भारतातील सर्व धर्माचे जातीचे पंथाचे व विविध प्रांतातील सुमारे 75 कवी व पंडित होते. संस्कृत प्राकृत पर्शियन कानडी हिंदी उर्दू मराठी तेलगू तामिळ इत्यादी बहुविध भाषा जाणारे अनेक मंडळी होती हिंदू संस्कृती व भाषा यांचे पुनर्जीवन करण्याचा प्रयत्न हे आपल्या पित्याचे उदाहरण शिवाजीराजांसमोर होते. मराठी संस्कृती व कर्नाटक संस्कृती या दोघांचा सुंदर मिलाप साधण्याचा शहाजीराजांनी प्रयत्न केलेला दिसतो. तसेच या ठिकाणच्या हिंदू नायकांमध्ये सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न केला .,”राष्ट्रीय एकात्मतेसाठी झटणारा पहिला थोर पुरुष” म्हणून शहाजी महाराजांचा नामनिर्देश झाला पाहिजे असे म्हैसूर सरकारनेही त्यांचा गौरव करताना म्हटले आहे. शहाजीराजांनी बृहन महाराष्ट्राची स्थापना केली म्हणजेच मराठी संस्कृतीचा महाराष्ट्राच्या बाहेर प्रसार व विकास केला. महाराष्ट्रातील अनेक घराणे शहाजीराजांबरोबर कर्नाटकात गेली ती तिथेच स्थायिक झाली. शहाजीराजांच्या नंतर व्यंकोजी राजाने तंजावर येथे स्वतंत्र राज्य स्थापन केले .अशाप्रकारे शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे व व्यंकोजीराजांनी तंजावर येथे स्थापन केलेल्या स्वत स्वतंत्र राज्याचे खऱ्या अर्थाने शहाजीराजे संकल्प होते.
सौजन्य-कै.श्रीमती लक्ष्मीबाईं बाबूराव पाटील (अनगर कर )मराठे कालीन इतिहास संशोधन मंडळ मोहोळ.
संस्थापक अध्यक्ष-श्री.उदयसिंह उर्फ़ फत्तेसिंह सुभाष देशमुख मोहोळ.7264033795. B. A. English, B. A. History, M. A. History, B. S. C. Horticulture in Y.. C. M. O. U.


