ताज्या घडामोडी

सफाळे | ता. ८

आगरी समाज सेवाभावी संस्था, केळवा रोड यांच्या वतीने आगरी समाज भवनाचा प्रथम वर्धापन दिन सोहळा रविवारी (दिनांक ८ ) मोठ्या उत्साहात आणि सामाजिक एकोप्याच्या वातावरणात केळवा रोड येथील आगरी समाज भवनात संपन्न झाला.आगरी समाजाची समृद्ध परंपरा, इतिहास व कार्य समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष महादेव घरत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या स्मरणिकेमुळे आगरी समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक योगदानाचा ठसा अधिक ठळक झाला आहे.या वेळी सामजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांच्या हस्ते जिल्हा स्तरीय कबड्डी सामन्याचे उद्घाटन करण्यात आले. समाजातील युवकांमध्ये क्रीडावृत्ती वाढावी, या उद्देशाने आयोजित केलेल्या या सामन्याला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वास्तुविशारद व सामाजिक कार्यकर्ते परेश घरत यांनी भूषवले.या कार्यक्रमाला आगरी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष सूर्यकांत पाटील विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते रामदास पाटील, दत्तात्रेय भोईर, महेंद्र किणी, जिल्हा क्रीडा महासंघाचे अध्यक्ष प्रमोद पाटील, पांडुरंग किणी, जयवंत किणी यांच्यासह समाजातील अनेक मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.विशेष बाब म्हणजे, या वर्धापन दिन सोहळ्यात महिला भगिनींची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. त्यांच्या सन्मानार्थ हळदीकुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी महिलांना साड्यांचे वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला. यामुळे कार्यक्रमाला सामाजिक सलोख्याची आणि सन्मानाची नवी उंची प्राप्त झाली.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??