ताज्या घडामोडी

तुळशीराम महाराज गुट्टे यांची फड हॉस्पिटलला भेट: एक प्रेरणादायी प्रसंग

परळी (प्रतिनिधी) ​प्रसिद्ध वारकरी कीर्तनकार, संत साहित्याचे अभ्यासक, आणि ‘सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन’चे संस्थापक अध्यक्ष ह .भ प डॉ.तुळशीराम महाराज गुट्टे यांनी फड हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली व डॉ तुळशीराम गुट्टे महाराज यांनी डॉ पांडुरंग फड डॉ शुभांगी फड यांचे तोंड भरून कौतुक केले.यावेळी त्यांच्या या भेटीमुळे रुग्णालयाच्या संपूर्ण वातावरणात एक सकारात्मक ऊर्जा आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.ह भ प डॉ.तुळशीराम ​महाराज गुट्टे यांचा जन्म परळी तालुक्यातील भूमिपुत्र आहेत त्यांची जन्मभूमी नंदनज असुन. त्यांनी ‘संत मुक्ताबाई’ यांच्या जीवनावर सखोल संशोधन करून पी. एच.डी. पदवी मिळवली आहे. त्यांची कीर्तन आणि प्रवचने समाजामध्ये अध्यात्मिक जाणीव आणि प्रबोधन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत.या भेटीच्या वेळी फड मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलचे संचालक डॉ. डॉक्टर पांडुरंग गंगाधर फड अस्थिरोग हाडाचे तज्ञ डॉ.शुभांगी पांडुरंग फड भुलतज्ञ, डॉ सिद्धेश्वर गंगाधर फड आणि त्यांच्या कुटुंबीयांनी महाराजांचे आदराने स्वागत केले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि पुष्पहार देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉ. शालिनीताई कराड, डॉ. बाळासाहेब कराड सर अणि हॉस्पिटल मधील कर्मचारी उपस्थित होते.ह भ प डॉ.तुळशीराम ​महाराजांनी हॉस्पिटलच्या कार्याची प्रशंसा केली आणि रुग्णसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या या भेटीमुळे उपस्थित सर्वांनाच एक वेगळी प्रेरणा मिळाली.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??