ताज्या घडामोडी
इंग्रुळ येथे जैन समाज सभागृहाचे उद्घाटन सांगली जिल्हा मध्य.बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते संपन्न.

शिराळा प्रतिनिधी
इंग्रुळ (ता. शिराळा) येथील पायाभूत सुविधा योजनेतंर्गत सुमारे 30 लाख रुपये खर्च करून जैन समाजासाठी बांधलेल्या सभागृहाचे उद्घाटन माजी आमदार व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते फीत कापून पार पडले. माजी जि. प. सदस्य अश्विनी नाईक प्रमुख उपस्थित होत्या. उद्घाटणानंतर मान्यवरांचा यांचा सत्कार सरपंच अभिजित पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी सोसायटी माजी अध्यक्ष चंद्रकांत पाटील, पाणी संस्थेचे उपाध्यक्ष विजय पाटील, धनाजी सपकाळ, अभिजित बागणे, चंद्रकांत पाटील, श्रीधर पाटील, अरुण पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी कांबळे, सर्जेराव कांबळे, राजू पाटील, कलगोंडा पाटील, संदीप शेटे, मोहन यादव, राजू पोकलेकर आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.