ताज्या घडामोडी

बापूराव पाटील यांच्या हस्ते येणेगुरच्या ज्योती मुदकन्ना यांचा सत्कार….

मुरूम, ता. उमरगा, ता. १२ (प्रतिनिधी) : उमरगा तालुक्यातील येणेगुर येथील सौ. ज्योती संतोष मुदकन्ना यांनी कौटुंबिक जबाबदारी सांभाळत नुकत्याच झालेल्या सरळ सेवा भरती परीक्षेत यश मिळवून त्यांची जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता पदावर निवड झाल्याने मुरूम येथे त्यांचा जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.१२) रोजी त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक महालिंग बाबशेट्टी, पंचायत समिती माजी उपसभापती गोविंद पाटील, येणेगुर ग्रामपंचायतीचे सदस्य संदीप बिराजदार, प्रा. शरद गायकवाड, शिक्षक सौरभ उटगे, व्यंकट यादव, संतोष मुदकन्ना आदींची उपस्थिती होती. फोटो ओळ: मुरूम, ता. उमरगा येथे बापूराव पाटील यांच्या हस्ते ज्योती मुदकन्ना यांचा सत्कार करताना पदाधिकारी व अन्य.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??