ताज्या घडामोडी

पीव्हीपी च्या सांख्यिकी विभागाचे डॉ. राव जयंती निमित्त विविध उपक्रम

कवठेमहांकाळ : प्रतिनिधी

येथील पद्मभूषण वसंतरावदादा पाटील महाविद्यालया मध्ये सांख्यिकी क्षेत्रातील दैदिप्यमान व्यक्तिमत्त्व, पद्मविभूषण डॉ. सी. आर. राव यांच्या जयंती निमित्त सांख्यिकी विभागाच्या वतीने प्रो. डॉ. सी. आर. राव स्मृतिदिन (२२ ऑगस्ट) व जयंती (१० सप्टेंबर) या कालावधीत विविध शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विशेषतः लक्षवेधी उपक्रम म्हणून SPSS वापरून डेटा विश्लेषण सर्टिफिकेट कोर्स तसेच सांख्यिकी क्षेत्रातील जनजागृती, संशोधन वृत्ती आणि विद्यार्थ्यांची सर्जनशीलता वाढविण्याच्या उद्देशाने क्वीझ, पोस्टर प्रेझेंटेशन, लघु व्हिडिओ, वक्तृत्व आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला आणि संशोधनात्मक दृष्टिकोनाला योग्य व्यासपीठ मिळावे यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे सायबर कॅम्पस कोल्हापूर येथील नॉन कन्वेशनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वुमन चे प्राचार्य डॉ. आर. जी. कुलकर्णी आणि विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर चे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. के. पाटील, माजी प्राचार्य डॉ. अशोक बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आधुनिक तंत्रज्ञान विद्यार्थ्यांनी आत्मसात करण्यासाठी आयोजित SPSS कोर्सच्या सांगता समारंभामध्ये पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी कु. स्नेहल भोसले (बी. एस्सी. भाग ३- वनस्पतिशास्त्र), कु. विशाखा पाटील , कु. धनश्री भोसले आणि कु. स्वरांजली कारंडे (बी. एस्सी. भाग ३- संख्याशास्त्र) या विद्यार्थिनींनी कोर्स विषयी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. कुलकर्णी यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या कोर्सची आवश्यकता असल्याचे सांगून संस्थेचे आणि महाविद्यालयाचे विशेष कौतुक केले. तर प्राचार्य डॉ. कुंभार यांनी या कोर्स साठी वनस्पतिशास्त्र तसेच प्राणिशास्त्र विषयाचे विद्यार्थी सहभागी झाले तसेच हा कोर्स सुट्टीमध्ये असूनही विद्यार्थ्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला याबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून यापुढेही असे उपक्रम आयोजित करावेत, असे सांगितले. याप्रसंगी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पाटील
यांनी विभागातर्फे विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना चालना देणारे पोस्टर सादरीकरण, आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणारा SPSS कोर्स आणि संशोधनवृत्ती प्रज्वलित करणारी राव जयंती असे विविध उपक्रम आयोजित केल्यामुळे सांख्यिकी विभागाचे शैक्षणिक वातावरण नक्कीच अधिक समृद्ध होईल, असे सांगितले. पोस्टर प्रेझेंटेशन उपक्रमामध्ये कु. नेत्रांजली गायकवाड (बी.कॉम. भाग – २), कु. चंद्रशेखर आवळे, कु. अस्मिता शेंडगे (बी. एस्सी. भाग १), कु. स्वरांजली कारंडे, कु. अमृता भोसले, कु. वैष्णवी भोसले, कु. रोहिणी माळी (बी. एस्सी. भाग ३) यांनी यशस्वी सहभाग नोंदविला. लघु व्हिडिओ निर्मिती मध्ये अभिषेक कोळी आणि धनश्री भोसले यांनी प्राविण्य मिळविले. कार्यक्रमा चे प्रास्ताविक प्रा. विजय कोष्टी यांनी केले तर कोर्स विषयी थोडक्यात आढावा डॉ. अण्णासाहेब सूर्यवंशी यांनी घेतला. आभार प्रदर्शन प्रा. गणेश सातपुते यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. सौ. शीतल पाटील कदम आणि प्रा. कु. स्नेहल झरेकर यांनी केले. सदर कोर्स आणि कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शिंदे, उपाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव सुदर्शन शिंदे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष विशाल शिंदे आणि प्राचार्य डॉ. एम.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??