विँशेष मुलांना रक्षाबंधन निमित्त स्नेहभोजन देऊन जपली सामाजिक बांधिलकी .

पिंपळे गुरव येथील ममता अंधः कल्याण केंद्रातील महाराष्ट्रातील विविध जिल्हातून शिक्षणासाठी आलेल्या विशेष मुलांना रक्षाबंधन निमित्त स्नेहभोजन देऊन त्याचा आनंद द्धिगुणीत केला.
आपल्यालाही समाजाचे काहीतरी देणे आहे आणि आपण ते दिले पाहिजे या मानवतेच्या दृष्टिकोनातून तेथील विशेष मुलांना स्नेहभोजन देऊन त्यांचा आनंद द्विगुणीत केला.मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान झाल्याचे आण्णा जोगदंड यांनी सांगितले.आम्ही सर्वानी ही त्यांच्या सोबत स्नेहभोजनचा आनंद घेतला.
यावेळी विशेष मुलांनी आपआपले मनोदय व्यक्त केला. सा.का.संग्राम तळेकर म्हणाले की मी नेहमीच अण्णांचे सामाजिक कार्य बघत असतो आणि ते कार्य पाहून मी प्रेरीत झालो आणि पंढरपूरहुन इथे आलो आणि मला या कार्यात सहभागी होता आले याचा मला खूप आनंद झाला यापुढेही मी येत जाईल आणि मदत करेल.
शहरातील नागरीकांनी आपआपल्या भागातील वास्तव्यास असलेल्या गरजूंना मदत करुन सामाजिक बांधिलकीतुन आपली माणूसकी दाखवून आपल्याला शक्य तेवढी मदत करण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक तुषार कांबळे यांनी केले . तुषार कांबळे म्हणाले कि आमची मुले महींद्रा कंपनीमध्ये आणि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी नगर आणि पुण्यामध्येही आमची मुले नोकरी करतात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. काही मुले ठाणे महानगरपालिका मध्येही कामाला लागली आहे, यावेळी कांबळे म्हणाले कि, तरुणांमध्ये सामाजिक कार्याची आवड निर्माण होते ही आनंदाची बाब आहे दरवर्षी आम्ही मुलांना प्रेक्षणीय स्थळे पण दाखवत आसतो.आण्णा जोगदंड मुळे खूप दानशूर व्यक्ती संस्थेशी जोडल्याचे त्यांनी आर्वजून सांगितले ,शहरातील दानशूर संस्थांनी व नागरिकांनी मदत करावी असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी ममता अंधः कल्याण केंद्राचे संस्थापक तुषार कांबळे, मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रतीचे, शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, पश्चिम महाराष्ट्र महीला अध्याक्षा संगिता जोगदंड,संग्राम तळेकर,सलिम मुजावर, समाधान चोपडे,आदेश जोमिवाळे ,मिरा देशमुख त्यादी उपस्थित होते.