ताज्या घडामोडी
नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस चाँद उर्दू हायस्कूलमध्ये उत्साहात साजरा

मिरज : शासनाच्या परिपत्रकानुसार भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस विविध उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने चाँद उर्दू हायस्कूलमध्ये चित्रकला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.या स्पर्धेत इयत्ता आठवी, नववी व दहावीतील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेच्या माध्यमातून विविध विषयांवर सुंदर चित्रे रेखाटली व विचारपूर्ण निबंध सादर केले.या उपक्रमासाठी कला शिक्षक चंद्रकांत माने यांनी विद्यार्थ्यांना चित्रकलेचे मार्गदर्शन केले, तर निबंध लेखनासाठी शिक्षकांनी विशेष सहकार्य केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळून त्यांचा आत्मविश्वास वृद्धिंगत होतो.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका तबस्सुम पालेगार तसेच सर्व शिक्षक उपस्थित होते.