ताज्या घडामोडी
गणेशोत्सव काळातील अन्यायी दरवाढीविरोधात कोकरुड येथे रास्ता रोको आंदोलन.

शिराळा प्रतिनिधी
मुंबईला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या प्रतिप्रवासी तिकिटाचे दर तब्बल ₹१२०० करण्यात आल्याच्या निषेधार्थ साम्राज्य ग्रुप फाऊंडेशनतर्फे आज सायं. ५:०० वा. कोकरुड येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.या वेळी आंदोलक व ट्रॅव्हल्स मालक यांच्यात तीव्र बाचाबाची झाली. शिराळा तालुका प्रवासी संघ देखील आंदोलनात सहभागी झाला होता.यामुळे सुमारे २ तास वाहतूक ठप्प राहिली.प्रवाश्यांच्या हक्कासाठी ही लढाई पुढेही सुरू राहणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.या वेळी उपस्थित प्रवाशी संघ शिराळा ,साम्राज्य फाउंडेशन.