ताज्या घडामोडी

*क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळ,मुंबई यांच्या वतीने पारंपरिक मंगळागौर कार्यक्रम उत्साहाने संपन्न

महिलांना दैनंदिन कामातून थोडा विरंगुळा मिळावा व आपली सांस्कृतिक परंपरा जपली जावी,हा एकच उद्देश होता ” अशी भावना श्री क्षत्रिय माळी समाज सुधारणा मंडळ,मुंबईचे अध्यक्ष प्रा.डॉ.प्रकाश संतोष माळी यांनी सावित्रीबाई फुले महिला मंडळ,मुंबई आयोजित मंगळागौर कार्यक्रमात व्यक्त केली.माळी समाज भवन,कृष्णानगर,उल्हासनगर-४ येथे श्रावणमास निमित्त संपन्न झालेल्या मंगळागौर कार्यक्रमाची सुरुवात माळी समाज मंडळाचे अध्यक्ष प्रा.डॉ.प्रकाश संतोष माळी व उपाध्यक्ष प्रकाश माधवराव महाजन यांच्या शुभहस्ते तसेच मंडळाचे सल्लागार मुरलीधर तुकाराम महाजन व व्यवस्थापक गजानन सुकदेव महाजन यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून करण्यात आली.यावेळी महामंडळाच्या कार्यकारी सदस्या रत्ना दंगल माळी,मुंबई मंडळाच्या कार्यकारी सदस्या रजनी प्रकाश माळी व निशा साहेबराव महाजन,महिला मंडळाच्या विद्यमान अध्यक्षा रेखा मुरलीधर महाजन,माजी अध्यक्षा यशोदा भिमराव माळी,पुष्पा देविदास चव्हाण व लता प्रकाश महाजन यांच्यासह महिला मंडळाच्या पदाधिकारी,कार्यकारी सदस्या व उपस्थित सर्व भगिनींनी भक्तिभावाने मंगळागौरचे पूजन केले.यानंतर नृत्य दिग्दर्शिका दिपाली विकास महाजन हिच्या उपस्थितीत सर्व भगिनींनी मंगळागौरचे विविध खेळ,झिम्मा,फुगड्या,गाणी आणि नृत्य सादर करून या कार्यक्रमाचा आनंद लुटला.महिला मंडळाच्या सचिव शारदा पंकज माळी यांनी या मंगळागौर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून उपस्थितांचे ऋण देखील व्यक्त केले.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??