ताज्या घडामोडी

भारतीयांनी मनामनात आपला राष्ट्रध्वज रुजविला पाहिजे…..प्रा. विनंती बसवंतबागडे

मुरूम, ता. उमरगा, ता. १४ (प्रतिनिधी) : स्वातंत्र्य चळवळीतील बलिदानाचा इतिहास भारतीयांनी मनामनात आपला राष्ट्रध्वज रुजविला पाहिजे, असे प्रतिपादन फार्मसी महाविद्यालयाच्या प्रा. विनंती बसवंतबागडे यांनी केले. श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागात राष्ट्रीय सेवा योजना व माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हरघर तिरंगा व तंबाखूमुक्त अभियानांतर्गत गुरुवारी (ता. १४) रोजी प्रमुख व्याख्यात्या म्हणून त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. यावेळी नगर शिक्षण विकास मंडळाचे संचालक प्रा. डॉ. सतिश शेळके, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना प्रा. बसवंतबागडे म्हणाल्या की, राष्ट्रध्वजाचे महत्त्व व राष्ट्रध्वजाचा पूर्व इतिहास विस्ताराने त्यांनी या वेळी मांडला. याप्रसंगी उपस्थितांना त्यांनी तंबाखूमुक्ततेची शपथ दिली. अध्यक्षीय समारोपप्रसंगी डॉ. सपाटे यांनी तरुणांनी राष्ट्रध्वजाचा स्वाभिमान बाळगून त्याचे पावित्र्य जतन केले पाहिजे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. सुधीर पंचगल्ले यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत तर आभार प्रा. अशोक बावगे यांनी मानले. यावेळी विविध शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या. फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात आयोजित व्याख्याना प्रसंगी प्रा. विनंती बसवंतबागडे बोलताना अशोक सपाटे, सतिश शेळके, चंद्रकांत बिराजदार व अन्य.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??