समाजातील प्रत्येकाने स्वच्छता दूत बनून पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे असे प्रतिपादन यशदा चे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी

येडे निपाणी (वार्ताहर) समाजातील प्रत्येकाने स्वच्छता दूत बनून पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे असे प्रतिपादन यशदा चे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. ते येडे निपाणी ग्रामपंचायत ने माझी वसुंधरा अभियान ६.० अंतर्गत आयोजित बिज रोपण कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी जलसाक्षरता केंद्राचे उपसंचालक आनंदराव पुसावळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वाळवा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. आबासाहेब पवार होते. यावेळी बोलताना कलशेट्टी पुढे म्हणाले माझी वसुंधरा अभियानामध्ये लोकसहभाग खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक नागरिक जागरूक झाला पाहिजे. शाळेतल्या विद्यार्थ्यांपासून याचे बीज रोपण व्हायला पाहिजे. आज प्लास्टिकचा अतोनात वापर सुरू आहे. प्रत्येकाने कटाक्षाने प्लास्टिक वापरणे टाळले पाहिजे. प्रत्येकाने जलदूत, स्वच्छता दूत, पर्यावरण दूत बनले तर ही वसुंधरा हिरवाईने नटेल, सर्वांना आरोग्य संपन्न जीवन मिळेल आणि सर्वांचा विकास होईल यासाठी लोकसहभागातून लोक चळवळ होणे गरजेचे आहे.
यावेळी त्यांनी येडे निपाणी ग्रामपंचायतीला माझी वसुंधरा ४.० मध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी आनंद पुसावळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की गावांमध्ये सर्व चांगले असेल तर स्थलांतर होणार नाही. यासाठी प्रत्येकाने स्वच्छता राखली पाहिजे. पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे. वृक्ष लागवड केली पाहिजे. यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना गटविकास अधिकारी आबासाहेब पवार म्हणाले की भारतीय संस्कृती पंचमहाभूतांवर अवलंबून आहे. पर्यावरणाचे संतुलन राखायचे असेल तर पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे. सध्या वाढत्या तापमानामुळे निसर्गात अनियमितता दिसून येत आहे यासाठी वृक्ष लावणे गरजेचे आहे तसेच पाण्याचा वापर जपून करणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सरपंच श्यामबाला माळी यांनी केले. या कार्यक्रमाला तालुका कृषी अधिकारी पीडी जावेद , सहाय्यक गटविकास अधिकारी एस एल सावंत, अभिजीत घोरपडे गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार, विस्तार अधिकारी श्रीधर कुलकर्णी, विस्तार अधिकारी धांगडे, विकास उरुणकर, एच व्ही कुंभार, आंबी साहेब , मंडल अधिकारी रुकसाना तांबोळी, पेठ चे जलदूत प्रकाश पाटील, माजी पंचायत समिती सदस्य शंकरराव चव्हाण, , उपसरपंच प्रताप पाटील, माजी पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य सी एच पाटील,ग्रामपंचायत अधिकारी अधिक पाटील, आरोग्य अधिकारी सोमनाथ अंकोलीकर, पोलीस पाटील बाबासाहेब गुरव, ग्रामपंचायत सदस्य शीतल पाटील, रूपाली शिंदे, स्वप्निल रासकर, किरण पाटील, सचिन यादव, रायसिंग पाटील आदी उपस्थित होते.