कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे जिल्हाध्यक्षपदी बाळ कांदळकर यांची बिनविरोध निवड…

कोकण मराठी साहित्य परिषद ठाणे जिल्हाध्यक्ष म्हणून कवी,लेखक व साहित्यिक बाळ कांदळकर यांची पुन्हा बिनविरोध निवड झाली आहे.ठाणे येथील विश्व गुरुकुल महाविद्यालयात संपन्न झालेल्या ठाणे जिल्हा मंडळ निवडणूकीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून मुंबई जिल्हा अध्यक्ष विद्या प्रभू उपस्थित होत्या.
यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद जिल्हा मंडळाची २०२५ ते २०२८ पर्यंत पुढील प्रमाणे निवड करण्यात आली.
*अध्यक्ष* श्री.बाळ कांदळकर
*उपाध्यक्ष* ऍड.सुदर्शन दळवी
*कार्यवाह* श्री.एम.आर.निकम
*कोषाध्यक्ष* संध्या लगड
*जिल्हा प्रतिनिधी* डॉ.योगेश जोशी
*कार्यकारिणी सदस्य*
श्री.रविंद्र घोडविंदे
श्री.निशिकांत महांकाळ
डॉ.अनिल पावशे
श्री.हेमंत नेहते
सौ.दिपाश्री इसामे
*सल्लागार*
सौ.नितल वढावकर
प्रा.डॉ.प्रकाश माळी
*प्रसिद्धी प्रमुख*
श्री.अजित महाडकर
कोकण मराठी साहित्य परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा.डॉ.प्रदीप ढवळ यांनी जिल्हाध्यक्ष बाळ कांदळकर व जिल्हा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले व पुढील वायचालीस शुभेच्छा दिल्या.