ताज्या घडामोडी

शेतकरी आत्महत्या सत्र दुर्दैवाने सुरूच

डॉ. अशोकराव ढगे राहुरी यांजकडून

अहिल्या नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील गोयगव्हाण येथील शेतकरी नानासाहेब ठोंबळ या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली नेवासा तालुक्यातील एकाच आठवड्यातील ही दुसरी दुर्दैवी घटना असून शेतकरी आत्महत्या सत्र सुरू राहिल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे नानासाहेब ठोंबळ हे कष्टाळू शेतकरी होते तथापि कपाशी पिकाला खत देण्यासाठी व पिकावर रोग पडल्यामुळे औषध मारण्यासाठी पैसे नसल्यामुळे आत्महत्या केली अशी माहिती मिळते. दुर्दैवाने त्यांच्या कुटुंबीयांकडे अंत्यविधीसाठी सुद्धा पैसे नव्हते त्यामुळे ग्रामस्थांनी निधी गोळा करून त्यांची अंत्ययात्रा पार पाडली इतकी दुर्दैवी व दुःखदायक तसेच क्लेशदायक आर्थिक स्थिती शेतकऱ्यावर ओढवली आहे महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडून शेतकऱ्याच्या दुर्दैवी आत्महत्या यासाठी खास निधी उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे विशेषतः महाराष्ट्रभर अति पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे त्याची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारकडे तातडीने मागणी करावी व भरीव निधी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न व्हावेत कारण की काळाची गरज आहे असे स्पष्ट प्रतिपादन डॉक्टर अशोकराव ढगे यांनी केले

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??