
इतिहासासोबतच गजी ढोल नृत्य संस्कृती जपत कार्य जयंती उत्सव करणाऱ्या कल्याणी वाघमोडे यांचे कौतुक – मा.पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे*
कुशल प्रशासक,पुण्यश्लोक अहिल्यादेवी या धर्माच्या नव्हे तर एकात्मतेच्या प्रतिक, आजच्या राजकारण्यांनी त्यांच्या राज्यकारभाराचा आदर्श घ्यावा – कल्याणी वाघमोडे
पुण्यश्लोक मातोश्री अहिल्यामाई यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न*
भवानीनगर/बारामती – अहिल्या क्रांती महिला विकास प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती साखर कारखाना भवानीनगर येथे अहिल्यादेवी होळकर यांचे ३०१ वी जयंती उत्सव चे औचित्य साधून प्रतिष्ठानच्या अध्यक्षा कल्याणी वाघमोडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन दरवर्षीप्रमाणे केले होते. गेली १२ वर्ष या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने मोठ्या थाटामाटात व उत्साहात जयंती उत्सव साजरा होत आला आहे.
सर्व महापुरुषांचे स्मारक अभिवादन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत व सत्कार त्यानंतर मनोगते व्यक्त केली.
प्रस्ताविक आयोजक कल्याणी वाघमोडे यांनी केले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंती निमित्त उपस्थित मान्यवर व सर्व बंधू भगिनी यांचे स्वागत व उपस्थितांचे आभार मानले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीसाठी प्रेरणादायी ठरावा म्हणून असे जयंती उत्सव साजरी करणे गरजेचे आहे. हा सामाजिक कार्याचा वसा आणि विचार अखंडपणे चालू राहील असा विश्वास यावेळी व्यक्त केला. छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त अभिवादन केले व शिवराज्याभिषेक दिनाच्या च्या शुभेच्छा ही दिल्या.सर्व महापुरुषांचे इतिहास फक्त वाचून बाजूला ठेवण्यासाठी नाही तर त्यांचे विचार आत्मसात करून अंगीभूत बाळगण्यासाठी असावे.यावेळी मार्गदर्शन करताना यांनी सांगितले की ,’जात धर्माच्या पलीकडच्या अहिल्यामाई’ ह्या एक धर्माच्या नव्हे तर एकात्मतेच्या प्रतिक आहेत. त्यांचे विचार फक्त इतिहासापुरतेच नाहीत तर ते पुढील पिढ्यांसाठीचे भविष्य आहे. त्यासाठी पुढील पिढ्यांना ती विचारधारा चालवण्यासाठी जयंती उत्सव साजरे करायचे असतात.
माझी पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या,अहिल्यादेवी होळकरांचा कार्यगौरव व इतिहास जयंती उत्सव साजरा करत कल्याणी वाघमोडे यांनी आदर्श निर्माण केला. आपणही समाजाचे काही देणे लागतो हे भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे.महाराष्ट्रात अनेक जयंती उत्सवाला उपस्थिती लावली मात्र अशी नियोजनबद्ध महिला नियोजित जयंती उत्सव कुठेही पाहिला नाही, इतिहास बरोबर गजी ढोल ची संस्कृती जपत कार्य करणाऱ्या कल्याणी वाघमोडे यांचे कौतुक मा.पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे यांनी केले. सर्वांना या उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.शुभेच्छा देत महिलांना पुढे येऊन कार्य केले पाहिजे, महिला कुठेही कमी नाहीत असा संदेश दिला.
तसेच डॉ. पंकज भिवटे, ज्ञानेश्वर बुरुंगले, एमपीएससी युवा मार्गदर्शक मनोज पिंगळे, डॉ.सुजित वाघमोडे यांनी ही मनोगत व्यक्त केले.
डॉ .उज्वला हाके यांनी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ता व मार्गदर्शक म्हणून अहिल्यामातेचा कार्य गौरव सर्वां पुढे मांडला. साधी राणी, उच्च विचारसरणी अशा अहिल्या मातेचे कार्य व महती सांगताना त्या म्हणाल्या, अठराव्या शतकातील जगातील उत्तम प्रशासक या अहिल्याबाई होळकर होत्या. एकमेव पुण्यश्लोक ही महान पदवी फक्त अहिल्यादेवी होळकर यांना आहे. अशाप्रकारे शिस्तबद्ध जयंती उत्सव प्रतिष्ठानच्या व महिलांच्या वतीने अविरतपणे चालू आहे अशी कौतुकाची थाप प्रतिष्ठानचे अध्यक्ष कल्याणी वाघमोडे यांना दिली. त्यांच्या विशाल कार्यातून सर्वांनी प्रेरणा घेत असेच कार्य केले पाहिजे, असा विश्वास व्यक्त केला. महिलांनी सक्षम होणे गरजेचे, अहिल्यादेवी ने खाजगी संपत्तीतून देशात सक्षम,सर्वांगीण महान कार्य केले. या कार्यात अहिल्यादेवींना घडवणाऱ्या व त्यांच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या गौतमाबाई होळकर यांच्या नावाने महिला पतसंस्था असाव्यात,असे मत यावेळी व्यक्त केले.सर्व सत्कारमूर्ती व यश प्राप्त विद्यार्थ्यांना अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
झी इन्स्टिट्यूट चे संचालक ,डिजिटल युगात शिक्षणाचे द्वार चालवणारे मा.राजेंद्र वाघमोडे व त्यांच्या मातोश्री यांना आणि व्यसनमुक्तीसाठी काम करणारे बी.एस.सय्यद यांना समाजरत्न पुरस्कार ने गौरवण्यात आले. वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचे व दहावीतील सर्व विद्यार्थ्यांचे ही सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. यामध्ये साक्षी टकले,सृष्टी जाधव, सामिया सय्यद, ओम खराडे, पृथ्वीराज थोरात ,सत्यम सोनवणे,अथर्व चोपडे यांनी दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले.
रंगतदार ठरलेला खेळ पैठणीचा विजेत्या जांब येथील महिला जयश्री कवळे ,उपविजेत्या मेखळीच्या पूनम चोपडे यांनी पटकावला. बाबीर तरुण गजे मंडळ वाळकी, तुळजाभवानी गजे मंडळ निकमवाडी यांनी रंगतदार गजी नृत्य सादर केले.
यावेळी माजी पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे, भाजपा ओबीसी मोर्चाच्या महाराष्ट्र महिला अध्यक्ष डॉ.उज्वला हाके यांच्या सहित उपाध्यक्ष,ऑल इंडिया धनगर महासंघ चे डॉ. पंकज भिवटे, पंचायत समिती गटनेते रावसाहेब चोरमले, यशवंत ब्रिगेडचे अध्यक्ष बापूराव सोलनकर, मा.पंचायत समिती सदस्य राहुल भाऊ झारगड,भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष वैभव सोलनकर,ढेकळवाडी चे माजी सरपंच सुभाष ठोंबरे,युवा उद्योजक अविनाश भिसे,शेतकरी सुकाणू समितीचे ॲड.श्रीकांत करे, भाजपा युवा मोर्चाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष संदीप केसकर, माजी सरपंच ग्रा.जांब अश्विनी पाटील, माजी सरपंच आशा रूपनवर, मार्केट कमिटीचे संचालक संचालक शुभम ठोंबरे, निरावागज चे उपसरपंच सागर देवकाते, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वाघमोडे, दत्तात्रय पुणेकर,मीनाताई थोरात, विजयाताई पिंगळे ,मंजुळाताई रुपनवर ,माजी सरपंच शिवाजी लकडे,विशाल खामगळ आदीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या सामाजिक उत्सव कार्यक्रम स्थळी उपस्थित असलेल्या सर्व बंधू,भगिनी यांचे आणि हा कार्यक्रम उत्साहात संपन्न करण्यात सहकार्य करणाऱ्या सर्व शुभचिंतक यांचे डॉ.सुजित वाघमोडे यांनी आभार व्यक्त केले.सूत्रसंचालन विलास दोडताले यांनी केले.
विचार फक्त इतिहासापुरतेच नाहीत तर ते पुढील पिढ्यांसाठीचे भविष्य आहे. अहिल्यादेवी ह्या मानवतेच्या, समतेच्या पुरस्कर्त्यां होत्या. मतदारांचा अपमान करून स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्या नेत्यांनी अहिल्यादेवींच्या राज्यकारभाराचा आदर्श घ्यावा. कारण आजच्या राजकारणाची पातळी फार खालवली आहे.सर्व जाती धर्माच्या लोकाना सोबत घेऊन चालण्याची त्यांची भूमिका होती.पुण्यश्लोक अहिल्यादेवी या धर्माच्या नव्हे तर एकात्मतेच्या प्रतिक – कल्याणी वाघमोडे



