ताज्या घडामोडी

डॉ .डी. वाय. पाटील ऍग्ग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी, तळसंदे येथे करिअरच्या अमर्याद संधी

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उद्योगाभिमुख विविध अभ्यासक्रमांना विना कॅप राऊंड, नियमित फी मध्ये थेट प्रवेश सुरु

कोल्हापूर : बदलत्या जागतिक शैक्षणिक व औद्योगिक गरजा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, कौशल्य विकास आणि उज्ज्वल करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने डी. वाय. पाटील ऍग्ग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी, तळसंदे, कोल्हापूर येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी विविध आधुनिक व रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे.डी वाय पाटील ग्रुप चे अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील साहेब, विश्वस्त ऋतुराज पाटील साहेब, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता आणि कुलसचिव (रजिस्ट्रार) डॉ. जयेंद्र खोत यांच्या सक्षम, दूरदर्शी आणि विद्यार्थीहितैषी नेतृत्वाखाली विद्यापीठाची शैक्षणिक, संशोधन व कौशल्यविकास क्षेत्रातील यशस्वी वाटचाल सुरू असून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत.याबाबत माहिती देताना विद्यापीठाचे प्रवेश संचालक प्रा. डॉ. शंकर पुजारी यांनी सांगितले की, आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी प्राप्त करणे पुरेसे नसून विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्ये, संशोधनवृत्ती, नेतृत्वगुण, संवाद कौशल्ये आणि उद्योग क्षेत्राशी सुसंगत ज्ञान विकसित होणे आवश्यक आहे. या सर्व बाबींचा विचार करून विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्याधुनिक आणि उद्योगाभिमुख अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत.अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग (CSE), आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग (AIML), डेटा सायन्स, फूड टेक्नॉलॉजी, ऍग्ग्रिकल्चर इंजिनिअरिंग, डेअरी टेक्नॉलॉजी, मेकॅनिकल इंजिनिअरिंग तसेच इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग यांसारखे आधुनिक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण, ऑटोमेशन, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग आणि कृषी तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये देश-विदेशात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होत असून विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअरसाठी सक्षम बनविण्याचे कार्य विद्यापीठ करत आहे.दहावीनंतर विद्यार्थ्यांसाठी इंटिग्रेटेड बी.टेक. (डिप्लोमा डिग्री) हा अभिनव अभ्यासक्रम उपलब्ध असून त्यामुळे विद्यार्थ्यांना कमी कालावधीत तांत्रिक शिक्षणासह उद्योग क्षेत्रातील अनुभव मिळण्यास मदत होते.याशिवाय व्यवस्थापन क्षेत्रात बीबीए, एमबीए, एमबीए ऍग्री-बिझनेस मॅनेजमेंट, एमबीए फार्मास्युटिकल मॅनेजमेंट, इंटिग्रेटेड बीबीए एमबीए तसेच ग्लोबल एमबीए हे अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थ्यांना व्यवस्थापन, उद्योजकता, आंतरराष्ट्रीय व्यवसाय आणि नेतृत्व विकासाच्या व्यापक संधी प्राप्त होतात. कायदा क्षेत्रात बी.ए. एलएल.बी. आणि एलएल.बी., संगणक अनुप्रयोग क्षेत्रात बीसीए आणि एमसीए, तर सर्जनशील क्षेत्रात बॅचलर ऑफ डिझाईन अंतर्गत व्हिज्युअल कम्युनिकेशन, यूआय/यूएक्स, अनिमेशन, प्रॉडक्ट डिझाईन, इंटिरिअर अँड स्पेस डिझाईन यांसारखे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना नव्या युगातील करिअरच्या संधी उपलब्ध करून देतात.तसेच बी.एस्सी. डेटा सायन्स, एम.एस्सी. ऑर्गेनिक केमिस्ट्री, अॅनालिटिकल केमिस्ट्री आणि फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांसारखे आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रम संशोधन व उद्योग क्षेत्रातील संधींसाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवितात.
डॉ. पुजारी पुढे म्हणाले की, विद्यापीठामध्ये आधुनिक प्रयोगशाळा, अत्याधुनिक पायाभूत सुविधा, उद्योग क्षेत्राशी असलेले सहकार्य, इंटर्नशिप, प्लेसमेंट सहाय्य, संशोधनाच्या संधी, क्रीडा व सांस्कृतिक उपक्रम यांद्वारे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासावर विशेष भर दिला जातो. गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विविध मेरिट स्कॉलरशिप योजनाही उपलब्ध आहेत.
करिअरला योग्य दिशा देणारे शिक्षण, कौशल्याधारित प्रशिक्षण आणि जागतिक स्तरावरील संधी मिळवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी डी. वाय. पाटील ऍग्ग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी, तळसंदे येथे भेट देऊन प्रवेश प्रक्रियेची माहिती घ्यावी, असे आवाहन प्रवेश संचालक प्रा. डॉ. शंकर पुजारी यांनी केले आहे. प्रा. डॉ. शंकर पुजारी
प्रवेश संचालक,डी. वाय. पाटील ऍग्ग्रिकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी, तळसंदे, कोल्हापूर.मो. ९९२२७७२५२२.

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??