
जळगाव जिल्हा प्रतिनिधी हमीद तडवी
यावल तालुक्यातील इतिहासात लिहिले गेलेले फैजपूर शहर मात्र अनेक वर्षांपासून घाणीच्या साम्राज्याच्या विळख्यात सापडले आहे याकडे मात्र नगरपरिषद नगरपालिका च्या अधिकारी पदाधिकारी यांचा जाणीवपूर्वक कानाडोळा होत असल्याचा फैजपूर शहरासह तालुक्यातील जनतेचा आरोप आहे.. वेळोवेळी घाणीच्या साम्राज्या बाबत निवेदने देऊन देखील हे अधिकारी व पदाधिकारी आपल्या जबाबदारी पासुन हात झटकत आहेत..तेरी भी चूप और मेरी भी चूप अशी परिस्थिती असल्या कारणाने फैजपूर शहर घाणीच्या साम्राज्यात दिसत आहे..तसेच दर आठवड्याला बुधवार रोजी भरत असलेला आठवडे बाजार देखील ह्याच घाणीच्या साम्राज्यात भरत असतो.आणि सध्या स्थितीत पावसाळा सुरू असल्याने ह्या आठवडे बाजार परिसरासह शहरात देखील घाणीच्या साम्राज्यात विषारी किडे जंतू तयार होऊ लागले आहेत तरी सुद्धा फैजपूर शहरातील नगरपरिषद नगरपालिकाचे अधिकारी कोणत्या झोपेत आहेत..असेही परिसरातील जनतेकडून बोलले जात असुन तालुक्यासह जळगाव जिल्ह्यात जोरदार चर्चा वाऱ्या सारखी पसरली आहे,तरी संबंधित जिल्हा पातळीवरील अधिकारी यांनी या संपूर्ण प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन घाणीच्या साम्राज्यापासून होणारे नागरिकांचे हाल व आरोग्य सांभाळावे आणि तात्काळ योग्य उपाययोजना करुन नेहमी करता फैजपूर शहराचे घाणीचे साम्राज्य दुर करुन फैजपूर शहरातील नागरिकांसह तालुक्यातील जनतेचे आरोग्य वाचवावे अशी रास्त स्वरुपाची मागणी फैजपूर शहरासह जिल्ह्यातील जनतेची मागणी आहे.. तात्काळ हे घाणीचे साम्राज्य दुर न केल्यास केल्यास फैजपूर शहराच्या जनतेसह तालुक्याच्या जनतेकडुन घाणीचे साम्राज्य हटाव आरोग्य बचाव आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा फैजपूर शहरासह तालूक्यातील जनतेने मुख्य अधिकारी व नगर पालिका नगर परिषद च्या पदाधिकाऱ्यांना ही गांभीर्याने दखल घ्यावी अशी आग्रही मागणी होत आहे.



