मरावे परी अवयव रूपी जगावे….

अवयवासाठी रुग्ण वेटिंग वर … मृत्यूचे प्रमाण वर
दरवर्षी शेकडो राज्यात अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत मरण पावतात. अवयवदान करणाऱ्यांची संख्या आणि प्रत्यारोपणाच्या प्रतिक्षेत असलेल्या लोकांची संख्या यातील तफावत यामागील कारण आहे. अवयव दात्यांची कमतरता ही अवयव प्रत्यारोपणाच्या मार्गातील प्रमुख समस्या आहे. जागरुकतेचा अभाव आणि अवयवदान व प्रत्यारोपणासाठी अपुऱ्या पायाभूत सुविधा यामुळे अवयवदानाचा वेग कमी आहे. लोकांमध्ये याबाबत अनेक गैरसमज आहेत आणि अवयव प्रत्यारोपणासाठी हे गैरसमज दूर करणे गरजेचे आहे. अवयवांचे विच्छेदन किंवा ते शरीरापासून वेगळे करणे हे निसर्ग आणि धर्माच्या विरुध्द असल्याचे बहुसंख्य व्यक्तीचे म्हणणे आहे.
महाराष्ट्रात अवयव गरजू रुग्णांची प्रतीक्षा यादी वर्षागणित वाढत चालाली आहे. राज्यात हृदय, मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुस, स्वादुपिंड, लहान आतडे, नेत्र यासारख्या अवयवांच्या प्रतीक्षत 9418 रुग्ण आहेत. खरे तर अवयव निकामी झाल्याने मृतुमुखी पडणाऱ्यांची सख्या खूप मोठी आहे. त्यामुळे अवयवदान याविषयी व्यापक जागरुकता आणि प्रत्यारोपण सहज, सुलभ आर्थिक आवाक्यात येणे गरजेचे आहे.
महाराष्ट्रात गेल्यावर्षी अवयव गरजूंच्या प्रतीक्षा यादीत 7 हजार रुग्ण होते. यावर्षी ही संख्या 9 हजार 500 झाली आहे. दात्यांअभावी रुग्णांची प्रतीक्षायादी वाढत चालली आहे. प्रतीक्षा यादीत न आलेले, पण अवयव निकामी होऊन दरवर्षी मृत्युमुखी पडणाऱ्या रुग्णांची संख्या खूप मोठी आहे. महाराष्ट्रात सद्या 141 रुग्णांना हृदय, 1 हजार 919 रुग्णांना यकृत, 7269 रुग्णांना मूत्रपिंड व 51 रुग्णांना फुफ्फुसांची गरज आहे. तर 32 रुग्ण स्वादुपिंडाच्या प्रतीक्षेत आहेत. खरे तर या प्रतीक्षा यादीबाहेरील हजारो रुग्ण असतात, जे अवयव नीकामी झाल्याने मृत्युमुखी पडतात. त्यातून अवयव दानाची गरज दिसून येते.
एखाद्या मेंदूमृत (ब्रेनडेड) व्यक्तीचे अवयव गरजू आठ व्यक्तींचे प्राण वाचवू शकतात, मात्र समाजात पुरेशी जाणीव – जागृती नसल्याने अवयव दानाचे प्रमाण खूप कमी आहे, जगण्याची इच्छाशक्ती असून ही प्रत्यारोपणासाठी आवश्यक अवयव मिळत नसल्याने आनेक रुग्ण मृत्युला कवटाळतात त्यामुळे अवयव दानाची चळवळ मोठ्या गतीने पुढे सरकणे आवश्यक आहे.
रस्ते अपघातात मरण पावलेल्यांची संख्या मोठी असल्यामुळे मृतांकडून अवयवदानाची शक्यता अधिक आहे. कधीही प्रत्येक मोठ्या शहरातील आयसीयूमध्ये आठ ते दहा ब्रेन डेथचे रुग्ण आढळतात. रुग्णालयात होणाऱ्या मृत्यूंपैकी ४ ते ६ टक्के मृत्यू ब्रेन डेडमुळे होतात. राज्यात दरवर्षी रस्ते अपघातात 4 हजार लोक मृत्युमुखी पडतात.
जिवंतपणी अवयव दान…!
तंदुरुस्त असलेली अठरा वर्षावरील कोणतीही व्यक्ते आपल्या मर्जीणे अवयवदान करू शकते. यामध्ये एक किडनी व यकृतचा एकतृतीयांश भाग दान करता येऊ शकतो. यकृताचा काही भाग कापून घेतल्यानंतर काही भाग कापून घेतल्यानंतर काही कालावधीत तो पुन्हा वाढू पूर्ण आकार प्राप्त कारु शकतो. अवयवदान करण्यामध्ये जवळचे नातेवाईक करू शकतात. एखाद्या व्याक्तेची किडनी निकामी झाली असेल आणि त्या कुटुंबातीळ किडनी मॅच होत नसेल तर दुसऱ्या एका वेगळ्या कुटुंबातील अशीच स्थिती असेल, तर दोन कुटुंबामध्ये किडनी दान होऊ शकते. त्याला कायद्याने मान्यता दिलेली आहे.
मृत्युनंतर अवयव दान…!
नैसर्गिक मृत्यू आणि मेंदूमुत्यू (ब्रेनडेड) हे दोन प्रकार आहेत. नैसर्गिक मृत्यूनंतर नेत्रदान, त्वचादान, देहदान करता येते. अपघात, आघात डोक्याला इजा किंवा मेंदूत रक्तस्त्राव या कारणांमुळे मेदूमुत्यू होतो. श्वसन बंद होते, पण कृत्रिम श्वासोच्छवासाद्वारे श्वसन चालू ठेवलेले असत. अशावेळी ब्रेनडेड (मेंदूमुत्यू) रुग्णांचे हृदय, मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुस, स्वादुपिंड, लहान आतडे, नेत्र, त्वचा, हाडे असे जे जे अवयव चांगले असेल ते दान करता येऊ शकतात.
अवयवदानासाठी अनेक संस्थांशी संपर्क साधता येतो. तुम्ही www.notto.abdm.gov.in वर नोंदणी करू शकता किंवा 1800114770 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता. नोंदणीनंतर, जारी केलेल्या कार्डची माहिती कुटुंबातील सदस्यांना द्यावी जेणेकरून ते मेंदूमुत्यू झाल्यास ते हॉस्पिटलमध्ये देऊ शकतील.
“मरावे परी अवयव रूपी जगावे… मनुष्याचा मृतदेह जाळून किंवा पुरुण टाकले जाते. दहन दफनापूर्वी मौल्यवान दागीने काढून घेतले जातात. परंतू त्याहूनही अनमोल दागींने म्हणजे आपले अवयव त्यांच्या प्रतीक्षेत हजारो व्यक्ती हृदय, मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुस, स्वादुपिंड, लहान आतडे, नेत्र, त्वचा, हाडे आदी अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत. अशा रुग्णांना ब्रेनडेड (मेंदूमुत्यू) व्यक्तंचे अवयव उपलब्ध झाल्यास त्यांना नवे जीवनदान मिळू शकते.



