ताज्या घडामोडी

पुज्य साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळात गितगायन व जेष्ठ नागरिकांचे वाढदिवस संपन्न

ईगल न्यूज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील

पुज्य साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळात गितगायन व जेष्ठ नागरिकांचे वाढदिवस संपन्न!! अध्यक्षीय भाषणात,कोण कहता हैं यारो आसमानको छेद पडता नहीं–प्रा शिवाजीराव पाटील* पु साने गुरुजी जेष्ठ नागरिक मंडळाची मासिक सभा रामबाग कॉलनीतील संस्थेच्या सभागृहात संपन्न झाली सुरुवातीला सर्व सदस्यांनी दोन मिनिटं स्तब्ध उभे राहून दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील तसेच सचिव एस एम पाटील व सर्व कार्यकारणीच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. माहे जुलै महिन्यात 12 ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस होते त्याना श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान अध्यक्ष व कार्यकारणी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संस्थेचे चिटणीस एस एम पाटील यांनी आजच्या मिटींगला नाश्ता देणारे श्री सी जे बडगुजर सर यांचा परिचय करून दिला आजच्या कार्यक्रमात नरेंद्र सोनवणे सर यांनी भगवंताचे दशावतार याबाबत अध्यात्मिक निरूपण केले त्याच्यानंतर श्री बापू हरी वानखेडे , छायाताई, श्री महाजन,श्रावण पाटील, एस एम पाटील , उपासणी साहेब,प्रा साळुंखे सर, नरेंद्र सोनवणे सर, साईदासजी राठोड, देवा सोनू भिल यांनी सुंदर भावगीते म्हटले जेष्ठ नागरिकांनी बहारदार भक्ती गिते गाऊन प्रेमाचा रंग भरत मनोरंजीत करत कार्यक्रमाची कुठे वेळ गेली हे समजलंच नाही ज्येष्ठ नागरिक संघाचं उत्कृष्ट कार्य सुरु असल्याबाबत सदस्यांनी समाधान व्यक्त केलं त्यानंतर अध्यक्षीय भाषणात प्रा. शिवाजीराव पाटील .: यांनी अध्यात्म, विज्ञान, सकारात्मक विचार आणि चांगल्या कर्मांचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. रामायण आणि महाभारतात युद्धाचे प्रसंग आहेत, मात्र त्यातून सत्य, कर्तव्य आणि धर्माचे पालन करण्याचा संदेश मिळतो. कर कटेवर -कमरेवर ठेवून उभा असलेला विठ्ठल हा कर्म, संयम आणि भक्तीचे प्रतीक आहे .
प्रत्येक व्यक्तीमध्ये आत्मा आणि चैतन्य आहे. प्रत्येक वस्तूचे स्वतंत्र अस्तित्व असल्याचे भौतिकशास्त्र सांगते. प्रत्येक व्यक्तीमध्येही अमर्याद क्षमता दडलेली असते. “कोण कहता यारो आसमान को छेद नहीं पडता! लेकिन यारो पत्थर को तो उछालके देखो? एकदा दगड उचलून तर पाहा,” या ओळींचा उल्लेख करत त्यांनी प्रयत्नांचे महत्व पटवले
सूर्य आणि चंद्र कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता अखंड कार्य करत असतात. त्यांच्याकडून निस्वार्थ कर्माची प्रेरणा घ्यावी. स्वतःमध्ये सकारात्मक ऊर्जा असेल तरच जीवनाला अर्थ प्राप्त होतो. आपण जे कर्म करतो त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. “जसे कर्म तसे फळ” हा निसर्गाचा आणि जीवनाचा अटळ नियम असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाला खमंग , जिलेबी नाश्ता देणारे श्री सी जे बडगुजर सर यांचाही विशेष सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव एस एम पाटील यांनी केले प्रार्थना श्री श्रावण पाटील यांनी गायिली, फोटोग्राफी आमचे निंभोरे गावाचे मित्र प्रकाश पाटील यांनी केली कार्यक्रमासाठी अध्यक्ष शिवाजीराव पाटील, उपाध्यक्ष उमाकांत नाईक, सचिव– शिवाजीराव मोहन पाटील, सहसचिव श्रावण पाटील, कोषध्यक्ष श्री देविदास बिरारी, देविदास रामदास जगताप, सुधाकर पवार,गोविंद चित्ते ,गंभीर चौधरी यांनी परिश्रम घेतले ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य माहे आगस्ट महिन्यामध्ये श्री रघुनाथ सैतान माळी यांचा नाश्ता राहील . ज्येष्ठ नागरिकांचे मनजिंकणारे माननीय गायक यांचे व उपस्थितांचे आभार सचिव एस एम पाटील यांनी मानलेत व अध्यक्षांच्या परवानगीने सभेची सांगता झाली पुढील आगस्ट महिन्याचे मीटिंग नेहमीप्रमाणे शेवटच्या रविवारी न होता,ती मीटिंग 17 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??