ताज्या घडामोडी

कलासंचालकांनी 15 ऑगस्ट पूर्वी कला शिक्षक महासंघाबरोबर बैठक घेऊन मागण्या निकाली काढा -प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद शिंदे

अन्यथा देशभरातील चित्रकला ग्रेड परीक्षेवर परीक्षेवर बहिष्कार..
परिक्षेपूर्वी निर्णय न घेतल्यास राज्यातील 36 प्रमुख शहरात लाखो विद्यार्थी आगळ्या वेगळ्या रंगव वेशभूषा काळी चित्रे काढून शासन , तंत्रशिक्षण मंत्री व कला संचालक यांचा निषेद करणार कलाशिक्षक महासंघाचा इशारा..निष्क्रीय कलासंचालकास तात्काळ पदावरून हटवून स्थापन करण्यात आलेले कला मंडळ तात्काळ बरखास्त करा .केवळ NEET निट परिक्षेचे पेपर फुटले नव्हे तर चित्रकला परिक्षेचे पेपर सुद्धा फुटला होता . ऐनवेळी पेपर रद्द केल्याने लाखो शालेय विद्यार्यांना मानसिक व त्यांच्या पालकांना आर्थिक फटका बसला होता . संघटनेने तंत्रशिक्षण मंत्र्याकडे तक्रार करूनही अद्याप कुणालाही शिक्षा नाही .

आशिया खंडात एकमेव नाव लौकिक व महाराष्ट्राची शान असलेले आणि महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत चालत असलेले कला संचलनालय सर जे .जे .स्कूल ऑफ आर्ट शिवाजी टर्मिनस मुंबई यांच्या मार्फत संपूर्ण भारतात एक हजार पेक्षा जास्त केंद्रावर गेल्या शंभर वर्षांपासून चित्रकला ग्रेड परीक्षा घेतल्या जातात . मात्र या परीक्षा व्यवस्थापनासाठी कला संचलनालयाचे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे देश भरातील अनेक वर्षांनुवर्षापासून चालत असलेले केंद्र शाळा प्रशासन स्वतःहून बंद करत आहेत .याला केवळ आणि केवळ महाराष्ट्र गव्हर्मेंट व त्यांचे कला संचालनालय , कलासंचालक , परीक्षा नियत्रंक, व नव्याने स्थापन करण्यात आलेले कलामंडळ जबाबदार आहेत . कला संचलनालय नावपुरते कार्यरत दिसून येत आहे त्यामुळे हजारो विद्यार्थी या परिक्षेपासून वंचित होत आहे.
पाच – पाच वर्ष परीक्षा मेहनताना मिळत नाही
शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा देण्यासाठी देशभरातून लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात परंतु ही परीक्षा घेण्यासाठी शासनातर्फे अल्प मानधन दिल्या जाते तेही मानधन पाच पाच वर्ष दिले जात नाही . त्यामुळे या परीक्षा व्यवस्थापनासाठी केंद्र , पर्यवेक्षक , वर्गचालक ,शिपाई , मिळत नाही त्यामुळे या परीक्षांकडे परिक्षा म्हणून कला संचलनालय बघत नाही . ही बाब अंत्यंत गंभीर आहे .अल्प व जुण्या काळातील मानधन तेही वेळेवर नाही त्यापेक्षा खाजगी वेठबिगारींचे मानधर चारपट

या परिक्षेसाठी केंद्र प्रमुख , लिपिक , कलाशिक्षक , पर्यवेक्षक व शिपाई यांना मानधन दिले जाते त्यापेक्षा वेठबिगारी याचे मानधन चारपटआहे ..सध्या केंद्र प्रमुख प्रति पेपर रु 125 (एकत्रित चार दिवसाचे मानधन रु.500) ; लिपिक प्रतिपेपर रु.50 (एकत्रित मानधन रु. 200 ) ; कलाशिक्षक प्रतिपेपर रु. 75 (एकत्रित मानधन 300) पर्यवेक्षक रु. 50 (एकत्रित मानधन रु. 200 ) ; शिपाई प्राति पेपर रू. 25 असे मानधन दिले जाते . त्यापेक्षा वेठबिगारी प्रतिदिन किमान रु.800पेक्षा कमी घेत नाही . ही बाब संतापजनक आहे.परिक्षा मानधन न वाढविल्यास परिक्षेवर बहिष्कार टाकणार

परीक्षाव्यवस्थापन मेहनताना केंद्र संचालक किमान मानधन प्रतिदिन रुपये 1000/- व (एकत्रित मानधन चार दिवसाचे रु. 4000/- चार हजार रुपये आणि 100 विद्यार्थ्यांच्या पुढील प्रति 100 च्या पटीत 400 रुपये प्रमाणे वाढीव मिळावे कलाशिक्षक प्रतिदिन रुपये 800 व (एकत्रित मानधन चार दिवसाचे रु . 3200 / तीन हजार दोनशे आणि 100च्या पटीत वाढीव विद्यार्थ्या मागे रु 300 प्रमाणे मिळावे लिपिक प्रतिदिन रुपये 500 व एकत्रित मानधन चार दिवसा चे 2000 दोन हजार आणि 100 च्या पटीत वाढीव विद्यार्थ्या मागे रू. 200 मिळावे पर्यवेक्षकांना प्रतिपेपर 500 प्रमाणे व प्रतिदिन 1000 प्रमाणे मिळावे शिपाई प्रतिपेपर रु. 300 व प्रतिदिन 600 प्रमाणे मिळावे.पेपरसंच बनविणे प्रतिबंच रु 2/- (दोन रुपये) प्रमाणे मिळावे.केंद्र परीक्षा व्यवस्थापन मेहनताना खर्च
केंद्र परीक्षा व्यवस्थापन खर्च तसेच साहित्य खरेदी खर्च केंद्राकडे जमा फिस मधून प्रति विद्यार्थी 50/-रुपये पन्नास प्रमाणे कपात करून उर्वरीत रक्कम कला संचलनालयाकडे जमा करण्या बाबत तात्काळ आदेश निर्गमित करावे .विद्यार्थ्याकडून परीक्षा शुल्कात कोणतीही वाढ न करता महासंघाने केलेल्या मागणीप्रमाणे परीक्षा मेहनताना मानधनात वाढ करून तात्काळ मंजूर करावी .यापूर्वी परीक्षा शुल्कात पाचपटीने वाढ परंतु मानधन जैसे थे ही बाब खेदजनक व संताप आणणारी आहे .15 ऑगपूर्वी महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघासोबत बैठक घेऊन मागण्या मंजूर करा … अन्यथा देशातील सर्व परीक्षा केंद्रावर नियमित वेळेत परीक्षा घेतली जाणार नाही याची नोंद कला संचालक व परिक्षा नियंत्रक, महाराष्ट्र राज्य सर जे स्कूल ऑफ आर्ट आवार छत्रपती शिवाजी टर्मिनन्स मुंबई यांनी घेऊन न्याय द्यावा .
स्नेहांकित ,
प्रल्हाद शिंदे
(प्रदेश अध्यक्ष)
9822625772
प्रल्हाद साळुंके
(प्रदेश सरचिटणीस)
9881404361धनाजी कराडे विभागीय अध्यक्ष
910202001..महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघ*

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??