डॉ. शंकर घनशामदास अंदानी यांची प्रेस क्लब ऑफ वर्किंग जर्नलिस्ट्सच्या राष्ट्रीय सल्लागारपदी नियुक्ती

पत्रकारांच्या सुरक्षा, हक्क आणि कल्याणासाठी कार्यरत असलेल्या अखिल भारतीय संघटना प्रेस क्लब ऑफ वर्किंग जर्नलिस्ट्स (PCW)) या नोंदणीकृत संघटनेच्या राष्ट्रीय सल्लागार (National Advi-sor) पदावर ज्येष्ठ पत्रकार, चार्टर्ड अकाउंटंट, लेखक, कवी आणि समाजसुधारक डॉ. शंकर घनशामदास अंदानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सय्यद खालिद कैस (अॅड.) (भोपाळ)यांनी ही नियुक्ती जाहीर केली. संघटनेच्या राष्ट्रीय संघटन सरचिटणीस श्रीमती शशी दीप (मुंबई) यांनी दिलेल्या माहितीनुसार,गेल्या तीन दशकांपासून निर्भीड पत्रकारिता, समाजसेवा आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल डॉ. अंदानी यांची पुढील आदेशापर्यंत राष्ट्रीय सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावरून ते पत्रकारांच्या कल्याणासाठी, संघटनेच्या विस्तारासाठी आणि विविध राष्ट्रीय उपक्रमांना मार्गदर्शन करणार आहेत. डॉ. अंदानी हे चार्टर्ड अकाउंटंट, लेखक, कवी, पत्रकार आणि समाजसुधारक म्हणून देशभर परिचित आहेत.त्यांनी आतापर्यंत १२,१०० हून अधिक कविता लिहिल्या असून १०६ पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांच्या साहित्यिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत लंडन बुक ऑफ रेकॉर्डस तसेच OMG बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये त्यांची नोंद करण्यात आली आहे. मातृत्व या विषयावर त्यांनी ‘आईची माया, आई अनेकतेची शक्ती’ या शीर्षकाखाली ५,१२१ कविता लिहून मातृत्वावरील जगातील सर्वात मोठा हिंदी कवितासंग्रह तयार केल्याचा मानही त्यांना मिळाला आहे. ‘बाबा अबोल जीवनाचे कोडे’, ‘बहिण माझी प्रिया ताई’ आणि ‘विकसित भारत २०४७’ ही त्यांची काही गाजलेली पुस्तके आहेत. शिक्षण, समाजसेवा आणि साहित्य क्षेत्रातील योगदानासाठी डॉ. अंदानी यांना ३,१८० हून अधिक पुरस्कार, ११५ पेक्षा अधिक वर्ल्ड रेकॉर्डस आणि १५० मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच ते ऑल मीडिया कौन्सिलचे राष्ट्रीय सहसंयोजक, महाराष्ट्र पत्रकार संघाचे राष्ट्रीय सल्लागार यासह विविध राष्ट्रीय संस्थांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. सध्या २१ राज्यांमध्ये कार्यरत असलेल्या प्रेस क्लब ऑफ वर्किंग जर्नलिस्ट्स या संघटनेने देशभरातील ७५० हून अधिक प्रेस आणि मीडिया संस्थांना एकत्र जोडण्याचे कार्य केले आहे. राष्ट्रीय सल्लागार म्हणून डॉ. अंदानी यांच्या अनुभवाचा संघटनेच्या बळकटीकरणासाठी आणि पत्रकारांच्या हिताच्या उपक्रमांसाठी मोठा लाभ होईल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे, संघटनेचे पदाधिकारी शाकिर मलिक, रियाज खान, अॅड. नीना गोयल, डॉ. प्रीती प्रसाद, पिंकी खनुजा, रेखा सोलंकी यांच्यासह विविध राज्यांतील पदाधिकारी आणि पत्रकारांनी डॉ. शंकर घनशामदास अंदानी यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.



